Breaking News

अफगाणिस्तानातील आत्मघाती हल्ल्यात ६३ ठार; १८० हून अधिक जण जखमी

काबुल – अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये दहशतवाद्यांनी एका लग्नसमारंभात घडविलेल्या भीषण आत्मघाती हल्ल्यात ६३ जणांचा बळी गेला. गेल्या काही महिन्यांमध्ये अफगाणिस्तानात झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला ठरतो. ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. पण दहशतवाद्यांना आधार मिळवून देणारी तालिबानदेखील या हल्ल्यासाठी तितकीच जबाबदार असल्याचा ठपका अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष ‘अश्रफ गनी’ यांनी ठेवला आहे. तर या हल्ल्यामुळे तालिबानबरोबरच्या शांतीचर्चेचा काहीही अर्थ नसल्याची टीका अफगाणिस्तानात सुरू झाली आहे.

आत्मघाती, हल्ला, अश्रफ गनी, आयएस, टीका, अफगाणिस्तान, तालिबान, अमेरिकाराजधानी काबुलच्या पश्‍चिमेकडील भागात शनिवारी रात्री एका लग्नसमारंभासाठी मोठ्या संख्येने गर्दी जमलेली असताना हा हल्ला झाला. स्फोट झाला त्यावेळी हजाराहून अधिक जण घटनास्थळी उपस्थित होते. या हल्ल्यात ६३ ठार तर १८२ जखमी झाले असून जखमींमध्ये महिला आणि मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याची माहिती अफगाणिस्तानच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने दिली. याआधी लग्नसमारंभात हल्ले घडविणारी तालिबानच या हल्ल्यासाठी जबाबदार असल्याचे बोलले जात होते. पण तालिबानने या हल्ल्याशी आपला काहीच संबंध नसल्याचे सांगून या हल्ल्याचा निषेध केला.

रविवारी ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली. पण अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष गनी यांनी या स्फोटासाठी तालिबानच कारणीभूत असल्याचा दावा केला. अफगाणिस्तानातील दहशतवाद तालिबानपासून प्रेरित असून ‘आयएस’ला देखील याच संघटनेने आधार दिल्याचा आरोप राष्ट्राध्यक्ष गनी यांनी केला. तालिबानमुळे अफगाणिस्तानात अस्थैर्य निर्माण झाले असून या जबाबदारीतून तालिबान आपली सुटका करून घेऊ शकत नसल्याचा ठपका गनी यांनी ठेवला.

अफगाणिस्तानातील शांती व स्थैर्यासाठी तालिबानबरोबर सुरू असलेली शांतीचर्चा योग्य मार्गाने पुढे चालल्याची घोषणा अमेरिकेने नुकतीच केली होती. पण यानंतरही अफगाणिस्तानातील दहशतवादी हल्ले थांबलेले नाहीत, अशी तक्रार राष्ट्राध्यक्ष गनी आणि अफगाणी जनता करीत आहे. त्यामुळे तालिबानबरोबरच्या शांतीचर्चेला काडीचाही अर्थ उरलेला नाही, अशी टीका अफगाणी जनता सोशल मीडियावरून करीत आहे. अफगाणी माध्यमेदेखील या तालिबानच्या भूमिकेवर प्रश्‍न उपस्थित करीत आहेत. दहशतवादाचा मार्ग सोडण्याचे आपले आश्‍वासन तालिबान पाळू शकेल का, असा प्रश्‍न या निमित्ताने विचारला जात आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info