अमेरिकी जनता ‘मेड इन चायना’च्या विरोधात – नव्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष

अमेरिकी जनता ‘मेड इन चायना’च्या विरोधात – नव्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष

वॉशिंग्टन – कोरोनाव्हायरस साथीच्या मुद्द्यावर अमेरिकी जनतेचा चीनविरोधात असलेला रोष अधिकच तीव्र होताना दिसत आहे. अमेरिकी संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणात ४० टक्क्यांतून अधिक ग्राहकांनी यापुढे मेड इन चायना उत्पादने खरेदी करणार नाही, असा निर्धार व्यक्त केला आहे. त्याचवेळी सुमारे ५० टक्के लोकांनी यापुढे अमेरिकी कंपन्यांनी चीनकडून होणारी आयात कमी करण्यावर भर द्यावा अशी आग्रही भूमिका मांडली आहे. अमेरिकी जनतेतील हा कल राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीनविरोधातील आक्रमक धोरणाला दुजोरा देणारा ठरतो.

अमेरिका, 'मेड इन चायना'

अमेरिकेतील ‘कोअरसाईट रिसर्च’ या संस्थेने ‘कंझ्युमर्स टर्न अगेन्स्ट मेड इन चायना’ नावाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. मार्च महिन्यापासून केलेल्या अमेरिकी ग्राहकांच्या सर्वेक्षणाच्या आधारावर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. कोरोना साथीवरून अमेरिकी जनतेत चीनविरोधात असणारा तीव्र रोष सर्वेक्षणाच्या निष्कर्षातून प्रतिबिंबित होतो, स्पष्ट उल्लेख अहवालात करण्यात आला आहे. ‘मेड इन चायना’ विरोधात नाराजी असणाऱ्या गटांमध्ये ६० टक्क्यांहून अधिक ज्येष्ठ नागरिक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले.

अमेरिका, 'मेड इन चायना'

अमेरिकेत कोरोनाची साथ वेगाने फैलावत असतानाच त्याचा मुकाबला करण्यासाठी अत्याआवश्यक असणाऱ्या वैद्यकीय सामग्रीचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र माध्यमांमधून समोर आले होते. अमेरिकेतील हॉस्पिटल्स व औषधाच्या दुकानांमध्ये निर्माण झालेल्या या टंचाईमागे चीनची धोरणे कारणीभूत ठरली होती. कोणा साथीच्या काळात चीनने आपल्याकडून निर्यात होणाऱ्या ‘पीपीई किट्स’, मास्क व आवश्यक औषधांच्या निर्यातीवर निर्बंध लादले होते. इतकेच नाही तर चीनमधील बहुराष्ट्रीय कंपन्यांवरदेखील वैद्यकीय उत्पादनांच्या निर्मितीसाठी दबाव टाकला होता. त्यामुळे अमेरिकेला प्रचंड टंचाईला तोंड द्यावे लागले होते.

हीच पार्श्वभूमी अमेरिकी ग्राहकांच्या बदललेल्या भूमिकेसाठी कारणीभूत ठरल्याचे दिसत आहे. अमेरिकी जनतेच्या या बदलत्या कलाची दखल संसदेतही घेण्यात आली असून चीनविरोधात अनेक विधेयके दाखल करण्यात आली आहेत. त्यात मेड इन अमेरिका उत्पादनांवर भर देण्याचा, चीनवर असलेले अवलंबित्व कमी करण्याचा आणि जागतिक व्यापारात चीनला वगळून नवी उत्पादन साखळी तयार करण्यावर भर देण्यात आला आहे. अमेरिकेप्रमाणेच युरोप व आशियाई देशांमध्येही अशाच स्वरूपाचे प्रयत्न सुरू असल्याचे समोर येत आहे.

English      हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info