रशियावर क्षेपणास्त्र हल्ला चढविल्यास आण्विक हल्ल्याने प्रत्युत्तर मिळेल – रशियन लष्कराचा इशारा

रशियावर क्षेपणास्त्र हल्ला चढविल्यास आण्विक हल्ल्याने प्रत्युत्तर मिळेल – रशियन लष्कराचा इशारा

मॉस्को – ‘रशिया किंवा रशियाच्या मित्रदेशांवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे प्रक्षेपित केली गेली तर तो रशियावरील अणुहल्ला समजला जाईल. या कारवाईला रशियाकडून आण्विक हल्ल्याने प्रत्युत्तर मिळेल’, असा इशारा रशियाच्या लष्कराने दिला. रशियन लष्कराचा हा इशारा अमेरिकेला उद्देशून असल्याचा दावा केला जातो. जून महिन्यात रशियाने प्रसिद्ध केलेल्या आण्विक प्रतिबंधात्मक धोरणातील हा एक प्रमुख मुद्दा असल्याचे बोलले जाते.

आण्विक हल्ल्याने प्रत्युत्तर, क्षेपणास्त्र हल्ला, क्षेपणास्त्र

रशियाने पहिल्यांदाच आपल्या आण्विक धोरणात महत्त्वाचे बदल केल्याचा दावा रशियन लष्कराचे अधिकारी करीत आहेत. अमेरिकेने आण्विक धोरणात केलेले बदल तसेच जगभरातील बदलत्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रशियाला हे बदल करावे लागल्याचे म्हटले जाते. ‘क्रास्नाया झ्वेझ्दा’ (रेड स्टार) या रशियन लष्कराच्या वर्तमानपत्रातील लेखात वरिष्ठ लष्करी अधिकारी मेजर जनरल आंद्रेई स्टर्लिन आणि कर्नल अलेक्झांडर ख्रियापीन यांनी याबाबतची माहिती प्रसिद्ध केली.

रशियाच्या नव्या आण्विक धोरणानुसार, अण्वस्त्र हल्ल्याव्यतिरिक्त क्षेपणास्त्र हल्ल्याला देखील अण्वस्त्र हल्ल्याप्रमाणे प्रत्युत्तर दिले जाईल, असे मोठे बदल रशियाने आपल्या आण्विक धोरणात केले आहेत. या पार्श्वभूमीवर, ‘रशियाच्या दिशेने प्रक्षेपित केलेले कुठलेही बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अण्वस्त्रधारी मानले जाईल. रशियाच्या लष्करी-राजकीय नेतृत्त्वाच्या आदेशांवर या क्षेपणास्त्र प्रक्षेपणाला आण्विक हल्ल्याने प्रत्युत्तर दिले जाईल’, असे रशियाच्या लष्करी अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

या नव्या आण्विक धोरणासह रशियाने आपल्या शत्रू देशांसाठी ’रेड लाईन्स’ आखल्या आहेत. या रेड लाईन्स ओलांडण्याचा प्रयत्न झालाच तर त्याचे गंभीर परिणाम असतील, असा इशारा रशियाने आपल्या या आण्विक धोरणातून दिल्याचे रशियन लष्कराच्या मुखपत्राने स्पष्ट केले.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info