अमेरिकेपाठोपाठ ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयासह सरकारी विभागांवर सायबरहल्ला झाल्याचे उघड – अमेरिकेव्यतिरिक्त सात देश हल्ल्याचे लक्ष्य झाल्याचा ‘मायक्रोसॉफ्ट’चा दावा

अमेरिकेपाठोपाठ ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयासह सरकारी विभागांवर सायबरहल्ला झाल्याचे उघड – अमेरिकेव्यतिरिक्त सात देश हल्ल्याचे लक्ष्य झाल्याचा ‘मायक्रोसॉफ्ट’चा दावा

 

वॉशिंग्टन/लंडन – मार्च महिन्यापासून रशियन हॅकर्सकडून सुरू असलेल्या सायबरहल्ल्याची वाढती व्याप्ती आता हळुहळू समोर येऊ लागली आहे. अमेरिकेनंतर आता ब्रिटनच्या सरकारी विभागांमधील कॉम्प्युटर नेटवर्क्सवरही सायबरहल्ले झाल्याचे उघड झाले आहे. ब्रिटनमधील सूत्रांनी याची कबुली दिली असून संरक्षण मंत्रालयासह काही महत्त्वाचे विभाग लक्ष्य ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचवेळी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची बहुराष्ट्रीय कंपनी ‘मायक्रोसॉफ्ट’ने जगातील किमान सात देशांमध्ये हल्ला झाल्याचा दावा केला आहे.

Microsoft Microsoft 

ब्रिटनमधील विविध सरकारी विभागांनी ‘सोलरविंड्स’ या कंपनीबरोबर जवळपास ५०हून अधिक करार केले आहेत. याच कंपनीच्या सॉफ्टवेअर सर्व्हरचा वापर करून सायबरहल्ला करण्यात आला असून आपल्या १८ हजार ग्राहकांना त्याचा फटका बसू शकतो, अशी कबुली कंपनीकडून देण्यात आली आहे. यात ब्रिटनमधील सरकारी विभागांचाही समावेश असून त्यात संरक्षण मंत्रालय, गृह विभाग, आरोग्य विभाग व शिक्षण विभागाचा समावेश आहे. ब्रिटनमधील गुप्तचर यंत्रणा ‘जीसीएचसी’कडूनही ‘सोलरविंड्स’चा वापर होत असल्याची माहिती समोर आली आहे.

Microsoft

सध्या ब्रिटनमध्ये झालेल्या सायबरहल्ल्याची पूणर्ं माहिती हाती आली नसली तरी त्याची व्याप्ती अमेरिकेइतकी नसल्याचा दावा ब्रिटीश सूत्रांनी केला आहे. मात्र ब्रिटनच्या ‘नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटर’ने ब्रिटनमधील खाजगी क्षेत्राला विशेष दक्षता घेण्याचा इशारा दिला आहे. ‘आंतरराष्ट्रीय स्तरावरील नवा सायबरहल्ला अतिशय गुंतागुंतीचा असून धोका रोखण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. कंपन्यांनी आपली नेटवर्क्स सुरक्षित राखण्यासाठी तातडीने पावले उचलावीत’, असे ‘नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटर’ने म्हटले आहे.

दरम्यान, मायक्रोसॉफ्टचे प्रमुख ब्रॅड स्मिथ यांनी कंपनीला मोठ्या प्रमाणात सायबरहल्ल्याचा फटका बसल्याची माहिती दिली आहे. त्याचवेळी अमेरिकेव्यतिरिक्त ब्रिटन, कॅनडा, मेक्सिको, बेल्जियम, स्पेन, इस्रायल व संयुक्त अरब अमिरात(युएई) हे देशही सायबरहल्ल्याचे लक्ष्य ठरल्याचा इशारा दिला आहे. मायक्रोसॉफ्टचे ग्राहक असणार्‍या ४० कंपन्या व विभागांवर सायबरहल्ला झाल्याचे उघड झाले आहे, असेही स्मिथ यांनी स्पष्ट केले. मात्र हल्ल्याची पूर्ण व्याप्ती अद्याप कळली नसल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info