राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या विरोधात सुरू असणारी निदर्शने रोखण्यासाठी फ्रान्समध्ये आणीबाणी लागू करण्याचे संकेत

राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या विरोधात सुरू असणारी निदर्शने रोखण्यासाठी फ्रान्समध्ये आणीबाणी लागू करण्याचे संकेत

पॅरिस – फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्याविरोधात सुरू असलेली निदर्शने म्हणजे ‘क्रांतीची सुरुवात आहे’ अशा आक्रमक शब्दात आंदोलकांनी सरकारला खरमरीत इशारा दिला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून फ्रान्सची राजधानी पॅरिस व भोवतालच्या भागात तीव्र निदर्शने सुरू असून गेल्या आठवड्यात त्याला हिंसक वळण लागले आहे. फ्रेंच सरकारने सुरक्षाव्यवस्था वाढविल्यानंतरही निदर्शकांची आक्रमकता कायम असून अखेरचा उपाय म्हणून आणीबाणी लागू करण्याचे संकेत सरकारकडून देण्यात आले आहेत.

आणीबाणी, निदर्शन, राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन, Yello Vest, निदर्शक, पोलिसी कारवाई, ww3, पॅरिस, एदुआर्द फिलिपशनिवारी राजधानी पॅरिसमधील निदर्शनांना पुन्हा एकदा हिंसक वळण लागल्याचे दिसून आले. शेकडो निदर्शकांनी ‘चॅम्प एलिसी’ भागासह शहरातील काही भागांमध्ये ठाण मांडले असून जोरदार तोडफोड व जाळपोळ सुरू केली आहे. हिंसक निदर्शकांनी काठ्या व कुर्‍हाडींच्या सहाय्याने दुकाने, इमारती तसेच गाड्यांच्या काचा फोडल्या असून शेकडो गाड्यांना आगी लावल्या आहेत. यात पोलीस, अग्नीशमन दल व इतर यंत्रणांच्या गाड्यांचा समावेश आहे.

‘यलो वेस्ट’ नावाने ओळखण्यात येणार्‍या निदर्शकांनी पोलिसांवर केलेल्या हल्ल्यात 23 पोलीस जखमी झाले आहेत. फ्रेंच यंत्रणांनी आतापर्यंत 400हून अधिक निदर्शकांना ताब्यात घेतले असून 130हून अधिक निदर्शक जखमी झाल्याचे सांगण्यात येते. पोलिसांनी निदर्शने रोखण्यासाठी अश्रूधुर तसेच पाण्याच्या फवार्‍यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला आहे. मात्र पोलिसी कारवाईचा आंदोलनावर कोणताही परिणाम झाला नसून निदर्शक अधिकच आक्रमक व हिंसक होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दोन आठवड्यांपूर्वी सुरू झालेल्या आंदोलनावर आता हिंसक कट्टरपंथिय गटांनी ताबा मिळविल्याचा दावा फ्रेंच यंत्रणांकडून करण्यात येत आहे. शनिवारी राजधानी पॅरिससह देशाच्या इतर भागात झालेल्या निदर्शनांमध्ये 75 हजारांहून अधिक निदर्शक सहभागी झाले होते, असा दावा अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने केला. निदर्शनांना लागलेल्या हिंसक वळणामुळे शनिवारी राजधानी पॅरिसचा काही भाग पूर्णपणे ‘लॉकडाऊन’ करावा लागला होता, अशी माहिती समोर आली आहे.

आणीबाणी, निदर्शन, राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन, Yello Vest, निदर्शक, पोलिसी कारवाई, ww3, पॅरिस, एदुआर्द फिलिपइंधनाची दरवाढ व राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या आततायी निर्णयांना विरोध करण्यासाठी सुरू झालेली निदर्शने अद्याप आटोक्यात आली नसल्याने त्याविरोधात टोकाची उपाययोजना करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. रविवारी मॅक्रॉन यांनी आपत्कालिन बैठक आयोजित केली असून पंतप्रधान एदुआर्द फिलिप यांनी आपला परदेश दौराही रद्द केला आहे. आंदोलन दडपण्यासाठी आणीबाणी घोषित करण्याचा निर्णायक पर्याय वापरला जाऊ शकतो, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

‘यलो वेस्ट’ नावाने सुरू झालेले आंदोलन राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासाठी सर्वात मोठे आव्हान ठरल्याचा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच मॅक्रॉन यांची लोकप्रियता 30 टक्क्यांच्या खाली नीचांकी पातळीवर गेल्याचे समोर आले होते. आंदोलन रोखण्यात आलेले अपयश त्यांची प्रतिमा अधिकच डागाळणारे ठरेल, असे दिसू लागले आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info