चीनच्या ३०० अब्ज डॉलर्सच्या उत्पादनांवर कर लादणार – राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची धमकी

चीनच्या ३०० अब्ज डॉलर्सच्या उत्पादनांवर कर लादणार – राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची धमकी

वॉशिंग्टन – अमेरिका व चीनमधील व्यापारयुद्धामुळे जागतिक मंदीचे सावट अधिक गडद होण्याचे इशारे दिले जात असतानाही, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनविरोधात पुकारलेलल्या व्यापारयुद्धातून माघार घ्यायला तयार नाहीत. अमेरिका व चीनमध्ये वाटाघाटी सुरू असल्या तरी योग्य वेळ येताच चीनच्या ३०० अब्ज डॉलर्सच्या उत्पादनांवर कर लादले जातील, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली. ट्रम्प यांच्या या धमकीमुळे चीनने गेल्या काही दिवसात अमेरिकेवर दडपण आणण्यासाठी केलेले प्रयत्न वाया गेल्याचे दिसत आहे.

उत्पादनांवर कर, वाटाघाटी, डोनाल्ड ट्रम्प, व्यापारयुद्ध, व्यापारी कराराचा भंग, चीन, अमेरिका, रेअर अर्थ मिनरल्सअमेरिका व चीनमध्ये गेल्या वर्षापासून जोरदार व्यापारयुद्ध सुरू असून त्यावर तोडगा काढण्यासाठी अनेक महिने चर्चाही सुरू होती. गेल्या वर्षाच्या अखेरीस व्यापारयुद्ध ९० दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर एप्रिल महिन्यात अमेरिका व चीन वाटाघाटींना सुरुवात झाली होती. मात्र चीन अटी मान्य करीत नसल्याने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अतिशय कठोर भूमिका घेतली. चीनने अमेरिकेच्या आक्रमकतेपुढे झुकण्याचे नाकारल्याने चर्चा फिस्कटली होती.

चर्चा फिस्कटल्यानंतर ट्रम्प यांनी चीनला एकापाठोपाठ एक धमक्या देत धडा शिकविण्याचा इशारा दिला होता. ‘चीनने अमेरिकेबरोबरील व्यापारी कराराचा भंग केला आहे. चीनला याची किंमत चुकती करावीच लागेल’ आणि ‘चीनने आता जर व्यापारी करार केला नाही तर २०२० सालानंतर त्यांना त्याचे भयानक परिणाम भोगावे लागतील’, अशा शब्दात ट्रम्प यांनी चीनला बजावले होते. त्यानंतर अमेरिकेने चीनच्या २०० अब्ज डॉलर्सच्या निर्यातीवर तातडीने अतिरिक्त कर लादत असल्याची घोषणाही केली होती.

उत्पादनांवर कर, वाटाघाटी, डोनाल्ड ट्रम्प, व्यापारयुद्ध, व्यापारी कराराचा भंग, चीन, अमेरिका, रेअर अर्थ मिनरल्सअमेरिकेने लादलेल्या करांना प्रत्युत्तर देताना चीननेही अमेरिकेच्या ६० अब्ज डॉलर्सच्या उत्पादनांवर कर वाढविले होते. त्यानंतर चीनमध्ये सक्रिय अमेरिकी कंपन्यांना लक्ष्य करण्याची धमकी देतानाच नव्या कायद्याचेही संकेत दिले होते. त्याचवेळी अमेरिकेचे रोखे विकण्याची तसेच तंत्रज्ञान क्षेत्रासाठी महत्त्वाच्या असणार्‍या ‘रेअर अर्थ मिनरल्स’चा पुरवठा थांबविण्याचा इशाराही चीनने दिला होता. मात्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर याचा काहीही परिणाम झालेला नसून उलट त्यांनी आता चीनच्या सर्व उत्पादनांवर कर लादण्याची धमकी दिली आहे.

ट्रम्प यांनी यापूर्वी चीनच्या उत्पादनांबाबत दिलेल्या धमक्या खर्‍या केल्या असून नवी धमकीही लवकरच अमलात आणली जाईल, असे दिसत आहे. नव्या धमकीची अंमलबजावणी झाल्यास चीनकडून अधिक आक्रमक पावले उचलण्याचे संकेत दिले गेले असून त्यामुळे व्यापारयुद्ध अधिकच भडकेल, असे दिसू लागले आहे.

आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या व्यापारयुद्धाचे जागतिक अर्थव्यवस्थेवरील परिणाम हळुहळू समोर येऊ लागले असून इतर देशांच्या उत्पादन तसेच व्यापार क्षेत्राला मोठा फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. या फटक्यांची तीव्रता व व्याप्ती वाढल्यास येत्या काही महिन्यातच जागतिक मंदीचा तडाखा बसू शकतो, अशी भीती काही दिवसांपूर्वीच व्यक्त करण्यात आली होती. ट्रम्प यांच्या धमकीमुळे ही भीती प्रत्यक्षात उतरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info