तिआनमिन प्रकरणी हॉंगकॉंगच्या जनतेने चीनचा दबाव झुगारला; अमेरिकेच्या युद्धनौकेची तैवानच्या आखातातून गस्त

तिआनमिन प्रकरणी हॉंगकॉंगच्या जनतेने चीनचा दबाव झुगारला; अमेरिकेच्या युद्धनौकेची तैवानच्या आखातातून गस्त

हॉंगकॉंग/बीजिंग – तिआनमिनसह इतर मुद्द्यांवर  आंतरराष्ट्रीय समुदायाने ढवळाढवळ करू नये, यासाठी चीनचा कम्युनिस्ट राजवटीकडून सुरू असलेले दबावाचे सारे प्रयत्न अपयशी ठरल्याचे दिसत आहे. गुरुवारी तिआनमिन हत्याकांडाच्या स्मृतिदिनी अमेरिकेच्या युद्धनौकेने तैवानच्या आखातातून गस्त घालत चीनच्या इशाऱ्याना जुमानणार नसल्याचे दाखवून दिले. त्याचवेळी हॉंगकॉंगच्या जनतेने तिआनमिनची आठवण जागविण्यासाठी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून चीनच्या कम्युनिस्ट राजवटीला उघड आव्हान दिले. सुरक्षा कायद्याच्या माध्यमातून हॉंगकॉंगवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनच्या राजवटीविरोधात केलेली ही कृती साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.

तिआनमिन, चीन, हॉंगकॉंग

गेल्या काही वर्षांपासून अमेरिका व चीनमध्ये व्यापारी आर्थिक तसेच राजनैतिक पातळीवर जबरदस्त संघर्ष सुरु आहे. दोन्ही देश परस्परांना लक्ष्य करण्याची एकही संधी सोडत नसून कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष शीतयुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचल्याचे  मानले जाते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व प्रशासनातील इतर सहकाऱ्यांकडून  सातत्याने किंवा दडपण टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी हॉंगकॉंग व तिआनमिनप्रकरणी चीनला फटकारले होते.

तिआनमिन, चीन, हॉंगकॉंग

तिआनमिनचा मुद्दा चीनच्या कम्युनिस्ट राजवटीसाठी अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. ४जून, १९८९ रोजी चीनच्या राजवटीने राजधानी बीजिंगमध्ये लोकशाहीसाठी आंदोलन करणाऱ्या तरुणांवर लष्करी बळाचा वापर करून निर्घृण हत्याकांड घडविले होते. यात हजारो जणांचा बळी गेला होता. मात्र आपल्या अफाट राजकीय व लष्करी शक्तीचा वापर करून चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने केवळ हे आंदोलन व हत्याकांडचा नाही तर या चळवळीचा सारा इतिहास दडपून टाकला होता. आजही चीनमध्ये या प्रकरणाचा उल्लेख करण्यावर पूर्णपणे बंदी आहे. असे असले तरी गेल्या वर्षापर्यंत हॉंगकॉंगमध्ये तिआनमिन हत्याकांडाच्या स्मृतिदिनी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत होते. चीनधार्जिण्या प्रशासनाने अनेक बंधने घातल्यानंतरही हॉंगकॉंगची जनता हा स्मृतीदिन उत्स्फूर्तपणे साजरा करीत होती. या पार्श्वभूमीवर, अमेरिका व हॉंगकॉंगच्या जनतेने केलेली कृती महत्त्वाची ठरते. अमेरिकेच्या ‘पॅसिफिक फ्लीट’ चा भाग असलेल्या ‘युएसएस रसेल’ या विनाशिकेने गुरुवारी तैवानच्या आखातातून प्रवास केल्याची माहिती अमेरिकेच्या नौदलकडून देण्यात आली. यापूर्वी चीनने तिआनमिन प्रकरणासह तैवानला अमेरिकेकडून करण्यात येणाऱ्या सहाय्याच्या मुद्द्यावरून अमेरिकेविरोधात जोरदार आगपाखड केली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत या दोन्ही मुद्द्यांवर अमेरिकेने आपली भूमिका कायम ठेवली आहे. गुरुवारी तिआनमिन हत्याकांडाच्या स्मृतिदिनी तैवानच्या आखातातून युद्धनौका धाडून अमेरिकेने चीनला खरमरीत संदेश दिल्याचे मानले जाते.

तिआनमिन, चीन, हॉंगकॉंग

त्याचवेळी दुसऱ्या बाजूला हॉंगकॉंगच्या जनतेनेही चीनच्या कम्युनिस्ट राजवटी विरोधातील संघर्षाचा आपला निर्धार तिआनमिनच्या प्रकरणात व्यक्त होत दाखवून दिला. हॉंगकॉंगमधील चीनधार्जिण्या प्रशासनाने  कोरोना साथीचे कारण पुढे करीत आपल्याच नागरिकांना तिआनमिनच्या स्मृतिदिनी कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी नाकारली होती.  गेल्या दोन दशकांहून अधिक काळ हॉंगकॉंगची जनता  तिआनमिनच्या स्मृती जागविण्यासाठी रस्त्यावर उतरते. यावर्षी प्रशासनाने परवानगी नाकारतानाच मोठ्या प्रमाणावर सुरक्षायंत्रणा तैनात केल्या होत्या. मात्र हा दबाव झुगारून हॉंगकॉंगचे हजारो नागरिक गुरुवारी संध्याकाळी मोबाईल, मेणबत्त्या व  तिआनमिनचे फलक घेऊन व्हिक्टोरिया पार्क भागात दाखल झाले.

नव्या सुरक्षा कायद्याच्या माध्यमातून हॉंगकॉंगवरील पकड घट्ट करण्याचे प्रयत्न आणि लष्कर उतरविण्याबाबत दिलेली धमकी, अशी पार्श्वभूमी असतानाही हॉंगकॉंगच्या जनतेने केलेली कृती कम्युनिस्ट राजवटीला दिलेला दिलेला मोठा धक्का ठरतो. यामुळे हॉंगकॉंगच्या लोकशाहीवादी आंदोलकांचा आत्मविश्वास अधिक दुणावल्याचे दिसू लागले असून याचे फार मोठे पडसाद पुढच्या काळात उमटू शकतात.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info