डोनाल्ड ट्रम्प यांच्या जाण्याने अमेरिका-इराण वैर संपणार नाही – इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी

डोनाल्ड ट्रम्प यांच्या जाण्याने अमेरिका-इराण वैर संपणार नाही – इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी

वैर, हल्ल्याचे आदेश, आयातुल्ला खामेनी, धार्मिक नेते, कारवाई, इराण, अमेरिका, ओबामा, TWW, Third World War

तेहरान – ‘अमेरिका आणि इराणमधील वैर डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनापर्यंत मर्यादित नाही. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपद सोडले तरी हे वैर संपणार नाही’, असे सांगून इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांनी अमेरिका व इराणमधील वैर यापुढेही सुरू राहणार असल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर ‘सुलेमानी यांच्या हल्लेखोरांचा नक्कीच सूड घेतला जाईल. ज्या कुणी या हल्ल्याचे आदेश दिले आणि त्याची अंमलबजावणी केली, त्यांना योग्यवेळी प्रत्युत्तर मिळेल’, अशी धमकी खामेनी यांनी दिली. काही तासांपूर्वीच इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी ट्रम्प यांच्या जाण्याने आपल्याला आनंद झाल्याचे म्हटले होते. त्यावर आयातुल्ला खामेनी यांनीच अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याशी वाटाघाटींसाठी तयार झालेल्या राष्ट्राध्यक्ष रोहानी यांना संदेश दिल्याचे दिसत आहे.

वैर, हल्ल्याचे आदेश, आयातुल्ला खामेनी, धार्मिक नेते, कारवाई, इराण, अमेरिका, ओबामा, TWW, Third World War

अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे कपटी, जुलमी असल्याचा ठपका ठेवून त्यांच्या जाण्याने इराणला अत्यानंद झाल्याचे इराणचे राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी खोचकपणे म्हटले होते. तर भावी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याबाबत चिथावणीखोर प्रतिक्रिया देण्याचे टाळून बायडेन यांच्याशी अणुकरार करण्यास इराण तयार होईल, असे जाहीर केले होते. इराणच्या सर्वोच्च धार्मिक नेत्यांनी राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांच्या या भूमिकेचा समाचार घेतला. यासाठी अमेरिकेतील सध्याचे ट्रम्प आणि त्याआधीच्या ओबामा प्रशासनाचा दाखला आयातुल्ला खामेनी यांनी दिला.

वैर, हल्ल्याचे आदेश, आयातुल्ला खामेनी, धार्मिक नेते, कारवाई, इराण, अमेरिका, ओबामा, TWW, Third World War

‘ट्रम्प आणि ओबामा यांच्या अमेरिकेने इराणसाठी काय केले, याचे तुम्ही साक्षीदार आहात. त्यामुळे ट्रम्प यांच्या अमेरिकेपुरते इराणचे वैर मर्यादित नाही आणि त्यांच्या जाण्याने हे वैर संपणारही नाही. शत्रूवर अजिबात विश्‍वास ठेवू नका, हा माझा सुस्पष्ट सल्ला आहे’, अशा कणखर शब्दात खामेनी यांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांना बजावले. अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झालेल्या जनरल कासेम सुलेमानी यांच्या परिवाराशी बोलताना खामेनी यांनी राष्ट्राध्यक्ष रोहानी यांना सावध केले.

वैर, हल्ल्याचे आदेश, आयातुल्ला खामेनी, धार्मिक नेते, कारवाई, इराण, अमेरिका, ओबामा, TWW, Third World War

त्याचबरोबर जनरल सुलेमानी यांची हत्या घडविणार्‍यांना आणि त्याचा कट आखणार्‍यांवर कारवाई होणारच, असे खामेनी यांनी ठासून सांगितले. सुलेमानी यांच्या हत्येनंतर इराकमध्ये अमेरिकेच्या लष्करी तळांवर झालेले हल्ले हे अमेरिकेला मुस्काटात देणारे ठरले. त्याचबरोबर सुलेमानी यांच्या नेतृत्वामुळे अमेरिका इराक आणि सिरियामध्ये अपयशी ठरल्याचा दावा इराणच्या सर्वोच्च नेत्यांनी केला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी इराणचे सर्वोच्च धर्मगुरु आयातुल्ला खामेनी यांची तब्येत खालावल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याचबरोबर इराणमध्ये सर्वोच्च धार्मिक नेत्यासाठी स्पर्धा सुरू झाल्याचेही बोलले जात होते. दोन दिवसांच्या अनिश्‍चिततेनंतर इराणने सदर वृत्त फेटाळले होते. अशा परिस्थितीत, काही मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत, खामेनी यांनी अमेरिकेला धमकावून या सर्व बातम्या खोडून काढल्या आहेत.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info