जॉर्डन-हमास इस्रायलच्या विरोधात एकजूट करतील – तुर्कीच्या मुखपत्राचा दावा

जॉर्डन-हमास इस्रायलच्या विरोधात एकजूट करतील – तुर्कीच्या मुखपत्राचा दावा

जॉर्डन-हमास इस्रायलच्या विरोधात एकजूट करतील - तुर्कीच्या मुखपत्राचा दावा

अंकारा – जॉर्डनमधील राजे अब्दुल्लाह दुसरे यांची राजवट आणि गाझापट्टीतील हमास यांच्यातील सहकार्य भक्कम होईल, असे संकेत मिळू लागले आहेत. इस्रायलच्या विरोधात जॉर्डन आणि हमास एकत्र येतील, असा दावा तुर्कीच्या मुखपत्राने केला. गेल्या महिन्यात इस्रायल आणि हमासमध्ये पेटलेल्या 11 दिवसांच्या संघर्षात जॉर्डनने स्वीकारलेल्या भूमिकेचा हवाला देऊन तुर्कीच्या मुखपत्राने हा दावा केला आहे.

पॅलेस्टिनींचे नियंत्रण असलेल्या वेस्ट बँक आणि जॉर्डनची सीमा जोडलेली आहे. याशिवाय जॉर्डनमध्ये आश्रय घेतलेल्या विस्थापित पॅलेस्टिनींची संख्या वीस लाखांच्या आसपास आहे. गेल्या महिन्यात हमासबरोबरचा संघर्ष पेटल्यानंतर जॉर्डनमध्ये पॅलेस्टिनी व पॅलेस्टिनी समर्थक जॉर्डनच्या जनतेने इस्रायलविरोधात निदर्शने केली होती. शेकडो निदर्शकांनी जॉर्डनच्या सीमेजवळ धडक देऊन इस्रायलमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला होता.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/jordan-hamas-will-unite-against-israel/