इंडो-पॅसिफिकमध्ये चीनला रोखणार्‍या अमेरिकेच्या ‘नेव्हल टास्क फोर्स’मध्ये ऑस्ट्रेलियाच्या सहभागाचे संकेत

वॉशिंग्टन/कॅनबेरा/बीजिंग – इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या लष्करी महत्त्वाकांक्षा रोखण्यासाठी अमेरिकेकडून उभारण्यात येणार्‍या ‘नेव्हल टास्क फोर्स’मध्ये ऑस्ट्रेलिया सहभागी होण्याचे संकेत मिळाले आहेत. बायडेन प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी एलि रॅट्नर यांनी अमेरिकेच्या संसदेत झालेल्या सुनावणीत यासंदर्भात माहिती दिल्याचे समोर आले आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतल्याचा दावाही करण्यात आला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी काही महिन्यांपूर्वी संरक्षण विभागाला चीनसंदर्भात एक अहवाल तयार करण्याचे आदेश दिले होते. संरक्षण विभागात असिस्टंट सेक्रेटरी पदासाठी शिफारस झालेल्या एलि रॅट्नर यांच्या नेतृत्त्वाखाली हा अहवाल तयार करण्यात आला होता. हा अहवाल संरक्षण विभागाला सादर केल्यानंतर अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी, संरक्षणदलांना चीनच्या धोक्याचा मुकाबला करण्याबाबत निर्देश जारी केले होते. या निर्देशांनुसार, कायमस्वरुपी ‘नेव्हल टास्क फोर्स’ व इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी एक ‘स्वतंत्र लष्करी मोहीम’(नेम्ड् मिलिटरी ऑपरेशन) आखण्याच्याही हालचाली सुरू झाल्या आहेत.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/indications-of-australias-participation-in-us-naval-task-force-blocking-china-in-indo-pacific/