माजी हेर असलेल्या जर्मन विश्‍लेषकाची चीनसाठी हेरगिरी

चीनसाठी हेरगिरी

बर्लिन – जर्मनीच्या गुप्तचर विभागाचे हेर म्हणून काम करून निवृत्त झालेल्या प्रख्यात विश्‍लेषक क्लॉस लँज यांनी चीनसाठी हेरगिरी केल्याचे उघड झाले आहे. जर्मन यंत्रणांनी लँज यांच्यावर हा गंभीर आरोप केला आहे. जर्मनीची अतिसंवेदनशील माहिती चीनला पुरवून क्लॉस लँज देशाची सुरक्षा धोक्यात आणल्याचा ठपका जर्मन यंत्रणांनी ठेवला आहे. याआधी अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया व भारतात देखील चीनसाठी हेरगिरी करणार्‍यांना अटक झाली होती. यामुळे चीन इतर देशांमध्ये करीत असलेल्या कारवाया व हस्तक्षेपाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

जर्मन वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, क्लॉस लँज यांनी जर्मनीच्या ‘फेडरल इंटेलिजन्स सर्व्हिस-बीएनडी’मध्ये सुमारे 50 वर्षे हेर म्हणून काम केले होते. जर्मन एजन्सीमधून निवृत्त झाल्यानंतर लँज यांनी 2010 साली अभ्यासगटात राजकीय विश्‍लेषक म्हणून काम सुरू केले होते. जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्या ‘ख्रिश्‍चन सोशल युनियन’ या पक्षाशी हा अभ्यासगट संलग्न असल्याचा दावा केला जातो. जर्मन अभ्यासगटासाठी विश्‍लेषक म्हणून काम करीत असतानाच लँज यांनी ‘डबल एजंट’ म्हणून चिनी गुप्तचर यंत्रणेसाठी हेरगिरी सुरू केल्याचा आरोप जर्मन यंत्रणांनी केला आहे. 2010 साली चीनच्या शंघाय येथील ‘ताँग्जी विद्यापीठात’ व्याख्यानासाठी गेेले असताना, चिनी गुप्तचर संघटनेने लँज यांना डबल एजंट म्हणून वापरण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर सप्टेंबर 2019 सालापर्यंत लँज यांनी विश्‍लेषकाच्या चेहर्‍याआड डबल एजंट म्हणून चिनी गुप्तचर यंत्रणेसाठी काम केले होते.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/former-german-analyst-spies-for-china/