युक्रेन नाटोमध्ये सहभागी न होता तटस्थ राहण्यास तयार

- तरीही रशियाने पुतिन-झेलेन्स्की चर्चेचा प्रस्ताव फेटाळला

मॉस्को/किव्ह – नाटोमध्ये सहभागी न होता युक्रेन तटस्थ राहण्यास तयार आहे, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी जाहीर केले. मात्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी थेट चर्चा करण्याची मागणी झेलेन्स्की यांनी सोडून दिलेली नाही. मात्र युक्रेनने रशियाच्या मागण्या पूर्णपणे मान्य केल्याखेरीज राष्ट्राध्यक्ष पुतिन युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करायला तयार होणार नाहीत, असे रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बजावले आहे.

नाटोमध्ये सहभागी

सोमवारीही रशियाने युक्रेनवरील हल्ल्यांचे सत्र कायम ठेवले. मारिओपोल या युक्रेनच्या प्रमुख शहरातील विमानतळ व बंदराचा ताबा रशियन सैन्याने घेतल्याचे वृत्त आहे. इथे काही ठिकाणी जनतेने रशियन सैनिकांचे स्वागत केल्याच्याही बातम्या आल्या आहेत. याबरोबरच रशिया युक्रेनचे दोन तुकडे करण्याच्या तयारीत असल्याचे दावे समोर येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर युक्रेनच्या सरकारने पाश्‍चिमात्यांना आवाहन केले आहे.

राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पाश्‍चिमात्य देश भेडकपणा दाखवित असून आपल्याशी पिंग-पॉंग खेळत असल्याचा ठपका ठेवला. तुर्कीच्या इस्तंबूल शहरात रशिया व युक्रेनचे प्रतिनिधी चर्चेसाठी दाखल झाले आहेत. या चर्चेच्या आधी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी आपला देश नाटोमधील सहभागाचा विचार सोडून देण्यास तयार असल्याची घोषणा केली. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचीशी आपली थेट चर्चा झाली, तर बरेच गैरसमज दूर होतील, असा दावा करून झेलेन्स्की यांनी पुन्हा एकदा या थेट चर्चेचा प्रस्ताव दिला.

रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेला हा प्रस्ताव धुडकावला आहे. आधी रशियाच्या मागण्या युक्रेनने मान्य कराव्या, त्यानंतर रशियन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करतील, असे लॅव्हरोव्ह यांनी स्पष्ट केले. दरम्यान, रशियाने युक्रेनच्या चेर्नोबिल अणुप्रकल्पाचा ताबा घेऊन बेजबाबदार कारवाया केल्या आहेत. यामुळे या प्रकल्पातून किरणोत्सर्ग होऊन त्याने युरोपिय देश देखील बाधित होतील, असा नवा इशारा युक्रेनच्या उपपंतप्रधान इरिना वेरेशूक यांनी दिला आहे.

तर युक्रेनी लष्कराच्या ताब्यात असलेल्या रशियन जवानांचा छळ सुरू असल्याचा आरोप रशियाने केला आहे. याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रशियाने केली आहे. रशियाने युक्रेनमध्ये हल्ला चढवून केलेल्या युद्धगुन्ह्यांची चौकशी युरोपिय महासंघाचे पथक करणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info