तिसरे महायुद्ध पेटल्यास रशियाचे पहिले लक्ष्य लंडन असेल

- रशियाच्या डिफेन्स कमिटीच्या सदस्यांचा इशारा

मॉस्को – तिसरे महायुद्ध पेटले तर सर्वात आधी लंडनला लक्ष्य केले जाईल, असाइशारा रशियाच्या डिफेन्स कमिटीचे सदस्य आंद्रे गुरुल्योव्ह यांनी केला आहे. महायुद्ध सुरू झाल्यानंतर रशिया कुणाचीही पर्वा न करता नाटोच्या सदस्यदेशांवर हल्ले चढविल आणि शत्रूचे सारे उपग्रह व संपर्क यंत्रणा नष्ट करील, असा इशाराही गुरुल्योव्ह यांनी दिला आहे. तर युक्रेनला शस्त्रास्त्रे पुरविणाऱ्या अमेरिकेच्या युक्रेनमधील दूतावासावर बॉम्ब टाकण्याची मागणी रशियन संसदेच्या डिफेन्स कमिटीच्या उपाध्यक्षांनी केलीआहे.

लक्ष्यरशियन लष्कराने पूर्व युक्रेनमधील महत्त्वाची शहरे ताब्यातघेतली आणखी काही शहरांवरील रशियन सैन्याने जबरदस्त हल्ले चढविलेआहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेने युक्रेनला अब्जावधी डॉलर्सची शस्त्रास्त्र व इतर आवश्यक साहित्य पुरविण्याची तयारी केली आहे. ब्रिटन तसेच नाटोचे सदस्य असलेल्या इतर काही युरोपिय देशांनी देखील युक्रेनला सहाय्य करण्यासाठी पावले उचलली आहेत. याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा रशिया सातत्याने देत आहे. शनिवारी एक रशियन वृत्तवाहिनीवरून रशियाच्या डिफेन्स कमिटीचे सदस्य आंद्रे गुरुल्योव्ह यांनी दिलेला इशारा प्रसारित करण्यात आला.

एकदा का तिसरे महायुद्ध पेटले की रशियासाठी नाटोचे सारे देश एकसमान असतील आणि त्यांच्यावर रशिया तुटून पडल्यावाचून राहणार नाही. लंडन हे रशियाचे पहिले लक्ष्य असू शकेल. कारण ‘अँग्लो-सॅक्सन’कडून जगाला सर्वाधिक धोका आहे, असे गुरुल्योव्ह यांनी म्हटले आहे. तसेच शत्रूचे सारे उपग्रह नष्ट करून त्यांची संपर्कयंत्रणा ढासळवून टाकण्याची रशियाची योजना असेल, असे गुरुल्योव्ह पुढे म्हणाले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादमिर पुतिन यांचे विश्वासू सहकारी असलेल्या गुरुल्योव्ह यांनी दिलेला हा इशारा म्हणजे ब्रिटनला दिलेली धमकीच ठरते, असे पाश्चिमात्य माध्यमांचे म्हणणे आहे.

दरम्यान, युक्रेनचा संघर्ष भडकला तर त्याचे रुपांतर तिसऱ्या महायुद्धात होईल आणि याने सारे काही बेचिराख होऊ शकते, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन व त्यांचे सहकारी सातत्याने सांगत आहेत. आपला हा इशारा पोकळ नसल्याची जाणीव करून देणारी पावलेही रशियाच्या नेत्यांनी उचललीआहेत. यामध्ये अण्वस्त्रांचे प्रदर्शन व त्यांच्या तैनातीबाबतच्या बातम्यांचा समावेश आहे. रशियाच्या या हालचाली थरकाप उडविणाऱ्या असल्या तरी युक्रेनमधील युद्धाच्या मुद्यावर अमेरिका व नाटोचे काही सदस्यदेश माघारघ्यायला तयार नसल्याचे दिसत आहे. अणुयुद्धाच्या धोक्याची जाणीव येण्याइतक प्रगल्भता नाटोच्या सध्याच्या नेतृत्त्वाकडे नाही, अशी टीकाही रशिया ने केली होती. मात्र यावेळी थेट लंडनला लक्ष्य करण्याची धमकी देऊन तिसऱ्या महायुद्धाच्या भीषणतेची पहिली झळ लंडनला बसेल, असा इशाराच रशियाने दिल्याचे दिसतआहे.

युक्रेनला सहाय्य करण्यासाठी ब्रिटन व इतर पाश्चिमात्य देश इतकी मोठी किंमत चुकती करण्यास तयार आहेत का, असा सवालच रशियाने या इशाऱ्याद्वारे केल्याचे दिसते आहे.

English       हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info