युक्रेनच्या ‘हवाईसुरक्षा यंत्रणे’ने पोलंडवर केलेल्या अपघाती क्षेपणास्त्रहल्ल्याने खळबळ

हवाईसुरक्षा

किव्ह/वॉर्सा/मॉस्को – मंगळवारी युक्रेनचा शेजारी देश व नाटोचा सदस्य असलेल्या पोलंडमध्ये रशियन बनावटीचे क्षेपणास्त्र कोसळल्याने खळबळ उडाली. ‘जी२०’ गटाची बैठक सुरू असतानाच घडलेल्या या घटनेने रशिया-युक्रेन संघर्षाचे रुपांतर रशिया-नाटो युद्धात होण्याची भीती वर्तविण्यात आली. या हल्ल्याविरोधात पाश्चिमात्य देशांनी रशियाला कठोर प्रत्युत्तर द्यावे, अशी मागणीही युक्रेनने केली. मात्र काही तासांच्या अवधीतच सदर क्षेपणास्त्र हल्ला युक्रेनच्याच हवाईसुरक्षा यंत्रणेकडून झाल्याचे उघड झाले. त्यामुळे रशियाला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सध्या तरी अपयशी ठरल्याचे दिसत आहे.

हवाईसुरक्षा

मंगळवारी दुपारी युक्रेन-पोलंड सीमेवर असलेल्या प्रेझ्यूवोडोव गावात क्षेपणास्त्र हल्ला झाला. या हल्ल्यामुळे झालेल्या स्फोटात दोघांचा बळी गेला असून काही जण जखमी झाले झाले आहेत. या हल्ल्यानंतर पोलंडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. हल्ला झालेले क्षेपणास्त्र रशियन बनावटीचे असल्याचे आढळल्यानंतर हा हल्ला रशियाकडून झाला असावा, अशी ओरड सुरू झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावरून या हल्ल्यावर टोकाच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. युक्रेन, पोलंडसह काही युरोपिय देशांनी रशियाविरोधात जोरदार आगपाखड सुरू केली.

हवाईसुरक्षा

बालीमध्ये सुरू असलेली जी२०ची बैठक थांबवून त्यातील नाटो सदस्य देशांची आपत्कालिन बैठक घेण्यात आली. या बैठकीत रशियाला प्रत्युत्तर देण्याचे इशारेही देण्यात आले. पूर्व युरोपातील अनेक देशांनी आपल्या संरक्षणदलांना अलर्टचे आदेश दिले आहेत. मात्र काही तासातच अमेरिका व नाटोने हल्ला रशियाने केला नसल्याचे जाहीर केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी स्वतः याबाबत निवेदन दिल्याने रशियाविरोधात ओरड करणाऱ्या देशांचे सूर बदलले. नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनीही हल्ला जाणुनबुजून करण्यात आलेला नाही व रशियाकडूनही झालेला नसल्याचे स्पष्ट केले.

रशियानेही अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे वक्तव्य उचलून धरून हा हल्ला रशियाकडून झाला नसल्याचे जाहीर केले. बुधवारी सकाळी पोलंडच्या राष्ट्राध्यक्षांनी हल्ला युक्रेनी हवाईसुरक्षा यंत्रणेतून झाल्याचे प्राथमिक तपासातून दिसत असल्याचा खुलासा केला. त्यामुळे रशियाची कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सध्या तरी फसल्याचे दिसत आहेत. नाटोने बुधवारी विशेष बैठक आयोजित केली असून घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल, असे म्हटले आहे.

हवाईसुरक्षा

पोलंडवरील क्षेपणास्त्राच्या हल्ल्यामागे रशिया-नाटोमध्ये संघर्ष पेटविण्याचे कारस्थान – रशियन अधिकाऱ्यांचा आरोप

मॉस्को – ‘पोलंडच्या हद्दीत पडलेल्या क्षेपणास्त्राशी रशियाचा काहीही संबंध नसल्याचे पुराव्यांवरून समोर येत आहे. ही घटना रशिया व नाटोमध्ये थेट संघर्षाचा भडका उडावा यासाठी चिथावणी देण्याचा प्रयत्न दिसतो’, असा आरोप रशियाचे संयुक्त राष्ट्रसंघटनेतील वरिष्ठ अधिकारी दिमित्रि पॉलिआन्स्कि यांनी केला. बुधवारी होणाऱ्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत या घटनेवर चर्चा होईल, असेही रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले.

English      हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info