रशियन फौजांकडून डोन्बास क्षेत्रातील दोन आघाड्यांवर घणाघाती हल्ले

- अमेरिकेचा चर्चेचा प्रस्ताव रशियाने फेटाळला

मॉस्को – युक्रेनला करण्यात येणारा शस्त्रपुरवठा व इतर संरक्षणसहाय्याच्या मोठ्या घोषणा होत असतानाच, रशियाने डोन्बास क्षेत्रात घणाघाती हल्ल्यांना सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्याभरात रशियाने डोन्बासमधील अनेक गावे व मोक्याची ठिकाणे ताब्यात घेतली असून बाखमत शहराला वेढा घालण्याची तयारी केल्याचे वृत्त ब्रिटीश यंत्रणांनी दिले. दरम्यान, अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी रशियात विलीन झालेल्या नव्या भागांना मान्यता न दिल्याने शांतीचर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी बजावले.

डोन्बास

गेल्या महिन्यात रशियाने खेर्सन शहरातून माघार घेतली होती. त्यानंतर युक्रेनी यंत्रणांनी पुढील काही दिवसांमध्ये क्रिमिआपर्यंत धडक मारु, अशा वल्गना करण्यास सुरुवात केली होती. मात्र प्रत्यक्षात खेर्सन शहराजवळून वाहणाऱ्या डिनिप्रो नदीच्या पलिकडे जाण्यातही युक्रेनी फौजांना शक्य झालेले नाही. रशियन फौजांनी डिनिप्रो नदीच्या पूर्वेकडील भागात भक्कम लष्करी आघाडी उभारली आहे. या भागातील रशियन फौजांकडून खेर्सन शहरावर सातत्याने तोफा, रणगाडा व रॉकेट्सच्या सहाय्याने जबरदस्त मारा सुरू आहे. या माऱ्यामुळे खेर्सनमधील वीजपुरवठाही खंडित झाला असून युक्रेनने या भागातील नागरिकांना शहराबाहेर सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यास सुरुवात केली आहे.

डोन्बास

दुसऱ्या बाजूला रशियाने डोन्बास क्षेत्रावर पूर्ण ताबा मिळविण्यासाठीही आगेकूच सुरू केली आहे. गेल्या आठवड्याभरात रशियाने डोन्बास क्षेत्रात प्रखर हल्ले चढवित नवी गावे तसेच भाग ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. सात दिवसात रशियाने दहापेक्षा अधिक गावे व महत्त्वाचे भाग ताब्यात घेतले असून बाखमत शहरावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ब्रिटीश यंत्रणांनी दिलेल्या माहिtतीनुसार, रशियन फौजांनी बाखमतला वेढा घालण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचवेळी युक्रेनी फौजांनी लुहान्स्क प्रांतांच्या सीमेवर सुरू केलेल्या हल्ल्यांविरोधात जोरदार प्रतिहल्ले चढवून युक्रेनी लष्कराला जेरीस आणले आहे.

डोन्बास

डोन्बास व खेर्सनमधील हल्ल्यांची तीव्रता वाढत असतानाच युक्रेनमधील महत्त्वाच्या शहरांवर क्षेपणास्त्र तसेच ड्रोन हल्ल्यांचे सत्रही सुरू आहे. ऐन हिवाळ्यात सुरू असलेल्या या जबर हल्ल्यांनी युक्रेनसमोरील चिंता सातत्याने वाढत आहेत. त्यासाठीच गेल्या काही दिवसात युक्रेन नव्या शस्त्रांची मागणी आक्रमकपणे मांडताना दिसत आहे. अमेरिका व नाटोने युक्रेनला सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी पुढील वर्षातच युक्रेनला नवी शस्त्रे मिळू शकतील, असे संकेत पाश्चिमात्य आघाडीने दिले आहेत.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याकडून राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी चर्चेसंदर्भात आलेला प्रस्ताव रशियाने फेटाळला आहे. अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी रशियात विलिन झालेल्या नव्या भागांना मान्यता दिलेली नसल्याने अमेरिकेबरोबर चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे रशियन प्रवक्ते पेस्कोव्ह यांनी बजावले.

हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info