Breaking News

सिरियाच्या हवाई क्षेत्रात अमेरिकेचे ड्रोन्स रोखण्यासाठी रशियाचे जॅमर्स

वॉशिंग्टन – अमेरिकेने सिरियावर हल्ले चढविण्याची जोरदार तयारी सुरू केली असली, तरी अमेरिकेच्या हल्ल्याची शक्यता विचारात घेऊन रशियाने फार आधीच आपली सज्जता वाढविल्याचे दिसत आहे. सिरियाच्या हवाई क्षेत्रात अमेरिका ड्रोन्सद्वारे टेहळणी व हल्ले चढवू शकते, याची जाणीव असलेल्या रशियाने या क्षेत्रात आपले ‘ड्रोन जॅमर्स’ कार्यान्वित केले आहेत, असा दावा अमेरिकेच्या लष्करी अधिकार्‍यांनी केला. 

या ‘ड्रोन जॅमर्स’मुळे ड्रोन्सकडून आपल्या मुख्यालयाला दिले जाणारे संदेश धडपणे पोहोचू शकत नाहीत. याचा परिणाम लष्करी मोहिमेवर होऊ शकतो, असा इशारा अमेरिकेच्या चार लष्करी अधिकार्‍यांनी दिला. कुठल्याही परिस्थितीत रशियाला अमेरिकेच्या लष्करी हितसंबंधांना धक्का द्यायचा आहे. म्हणूनच रशियन्स इथे ड्रोन जॅमर्स कार्यान्वित करीत असल्याचा ठपका या अधिकार्‍यांनी ठेवला. 

याआधी सिरियामध्ये अमेरिकेचे काही ड्रोन्स कोसळले होते. पण यामागे रशियाचे ‘जॅमर्स’ होते का, ते स्पष्ट झालेले नाही, असेही या अधिकार्‍यांनी म्हटले आहे. त्यामुळे आत्ता सिरियाच्या क्षेत्रात उघडपणे अमेरिका व रशियाचा सुरू होत असलेला संघर्ष छुप्यारितीने फार आधीपासूनच सुरू झाला होता, असे संकेत मिळत आहेत. 

(Courtesy: www.newscast-pratyaksha.com)

leave a reply