मॉस्को – अमेरिकेच्या किनारपट्टीवरील शहरे गिळंकृत करू शकणार्या ३०० फूटी उंच त्सुनामीच्या लाटा निर्माण करण्याचे भयावह तंत्रज्ञान रशियाकडे आहे. काही महिन्यांपूर्वी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी जगासमोर आणलेल्या आण्विड ड्रोन पाणबुडीमुळे ही त्सुनामी निर्माण होऊ शकते. पण रशियाने सदर आण्विक ड्रोन पाणबुडीचा वापर केला तर ‘त्सुनामी’सह प्रलय माजविणारा किरणोत्सर्गी पाऊसही कोसळू शकतो, असा दावा अमेरिकेतील आघाडीच्या ‘न्यूक्लिअर फिजिसिस्ट’ने केला.
महिन्याभरापूर्वी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर आपल्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन घडविले होते. हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे, अण्वस्त्रे तसेच इतर शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन घडवून रशियाने अमेरिका आणि मित्रदेशांना इशारा दिला होता. यावेळी रशियन राष्ट्राध्यक्षांनी ‘स्टेटस-६’ या पाणबुडीची निर्मिती सुरू असल्याची घोषणा केली होती. सुमारे ५० मेगाटन अणुबॉम्ब वाहून नेणारी ही पाणबुडी स्वनियंत्रित असल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केला होता.
आपल्या या ड्रोन पाणबुडीसमोर जगातील कुठलेच शस्त्र टिकाव धरू शकत नसल्याचे पुतिन म्हणाले होते. तसेच ही ड्रोन पाणबुडी म्हणजे पाण्याखालील छुपे अणुबॉम्ब असल्याचे पुतिन यांनी जाहीर केले होते. ५६ सागरी मैल वेगाने प्रवास करणारी ड्रोन पाणबुडी सुमारे ६२०० मैलपर्यंतचा प्रवास करू शकते, अशी माहिती रशियन लष्कराने दिली होती. यावर लष्करी विश्लेषकांनी चिंता व्यक्त केली होती. रशियातून रवाना झालेली ही पाणबुडी अमेरिका तसेच मित्रदेशांच्या किनारपट्टीच्या शहरासाठी धोकादायक असल्याचा इशारा या विश्लेषकांनी दिला होता.
पण ‘न्यूक्लिअर फिझिसिस्ट’ रेक्स रिचर्डसन यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत रशियाच्या या ‘स्टेटस-६’ आण्विक ड्रोन पाणबुडीने धडक दिली तर त्यामुळे पाण्याखाली निर्माण होणार्या ऊर्जेचा वापर करून ३०० फुटांहून अधिक उंचीच्या महाकाय त्सुनामी लाटा निर्माण होतील. यासाठी २०११ साली जपानच्या ‘फुकुशिमा’ येथील भुकंपामुळे निर्माण झालेल्या त्सुनामीचा दाखला रिचर्डसन यांनी दिला.
अमेरिकेची लॉस एंजिलिस किंवा सॅन डियागो ही शहरे ‘स्टेटस-६’च्या या हल्ल्यात गिळंकृत होतील, अशी चिंता रिचर्डसन यांनी व्यक्त केली. या आण्विक ड्रोन पाणबुडीच्या हल्ल्याने होणारे नुकसान इतक्यावरच थांबणार नाही तर पाण्याखालील आण्विक स्फोटामुळे निर्माण होणार्या ऊर्जेनंतर निर्माण होणारे ढग आसपाच्या भागात किरणोत्सर्गी पावसाचे कारण ठरू शकतात, असा इशारा रिचर्डसन यांनी दिला आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info/status/989785629285343232 | |
https://www.facebook.com/WW3Info/posts/387440951664395 |