रशियाकडून क्युबातील संरक्षणतळ पुन्हा सक्रिय करण्याचे संकेत ‘क्युबन मिसाईल क्रायसेस’चा पुढचा भाग सुरू झाल्याचा माध्यमांचा दावा

रशियाकडून क्युबातील संरक्षणतळ पुन्हा सक्रिय करण्याचे संकेत ‘क्युबन मिसाईल क्रायसेस’चा पुढचा भाग सुरू झाल्याचा माध्यमांचा दावा

मॉस्को – क्युबाचे नवे राष्ट्राध्यक्ष ‘मिगेल डिआज-कॅनल’ रशियाच्या दौर्‍यावर असून यावेळी दोन देशांमधील सामरिक सहकार्य अधिक मजबूत करण्यावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी रशियाने क्युबाला सुमारे चार कोटी डॉलर्सचे संरक्षण सहाय्य देण्याचे संकेतही दिले असून येत्या काही दिवसात त्यावर करार होईल. रशिया आणि क्युबामधले हे सहकार्य म्हणजे सार्‍या जगाला अणुयुद्धाच्या खाईत ढकलणार्‍या ‘क्युबन मिसाईल क्रायसेस’चा पुढचा भाग असल्याचा दावा करण्यात येत आहे.

‘क्युबन मिसाईल क्रायसेस’, अणुयुद्ध, सामरिक सहकार्य, संरक्षणतळ, संरक्षण सहाय्य, रशिया, INF ‘मिगेल डिआज-कॅनल’ यांनी एप्रिल महिन्यात ‘रौल कॅस्ट्रो’ यांच्याकडून राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यानंतर प्रथमच ते मोठ्या परदेश दौर्‍यावर दाखल झाले असून रशियाबरोबरच ते चीनलाही भेट देणार आहेत. क्युबा व रशिया-चीनमधील संबंध अनेक दशकांपासून विकसित झाले असून अमेरिकाविरोध हे त्यातील प्रमुख सूत्र राहिले आहे. गेल्या काही महिन्यात रशिया व चीन या दोन्ही देशांचे अमेरिकेबरोबरील संबंध सातत्याने ताणले जात आहेत. त्यामुळे क्युबाच्या राष्ट्राध्यक्षांनी या दोन्ही देशांचा दौरा करणे महत्त्वाचे मानले जाते.
राष्ट्राध्यक्ष ‘मिगेल डिआज-कॅनल’ यांनी रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन व पंतप्रधान दिमित्रि मेदवेदेव यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही देशांमध्ये सुमारे २६ कोटी डॉलर्सहून अधिक रकमेचे करार करण्यात आले. त्यात रेल्वे, ऊर्जा व वाहन क्षेत्रातील करारांचा समावेश आहे. मात्र या करारांव्यतिरिक्त दोन देशांमध्ये सामरिक सहकार्याबाबत झालेले एकमत महत्त्वाचे मानले जाते.

‘क्युबन मिसाईल क्रायसेस’, अणुयुद्ध, सामरिक सहकार्य, संरक्षणतळ, संरक्षण सहाय्य, रशिया, INF अमेरिका आणि सोव्हिएत रशियामधले शीतयुद्ध संपुष्टात आल्यानंतर रशिया पहिल्यांदाच क्युबाबरोबर इतक्या मोठ्या प्रमाणात सामरिक सहकार्य विकसित करीत आहे. १९६२ साली सोव्हिएत रशियाने क्युबामध्ये अण्वस्त्रे तैनात केली होती. आपल्या सीमेच्या इतक्या जवळ अण्वस्त्रे तैनात करून सोव्हिएत रशियाने युद्धाची घोषणा केली आहे, असा इशारा अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी दिला. ही तैनाती मागे घेतली नाही, तर हल्ला चढविला जाईल, असे राष्ट्राध्यक्ष केनेडी यांनी बजावले होते. रशियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निकिता क्रुश्‍चेव्ह यांनी त्याला नकार दिला होता. यामुळे दोन महासत्तांमध्ये आण्विक युद्धाचा भडका कुठल्याही क्षणी उडू शकेल, अशी स्थिती निर्माण झाली होती.

‘क्युबन मिसाईल क्रायसेस’, अणुयुद्ध, सामरिक सहकार्य, संरक्षणतळ, संरक्षण सहाय्य, रशिया, INF

याला ‘क्युबन मिसाईल क्रायसेस’ म्हटले जाते. आजही अत्यंत धोकादायक परिस्थितीचा दाखला देण्यासाठी ‘क्युबन मिसाईल क्रायसेस’चा संदर्भ दिला जातो. त्या काळात हे संकट टळले असले तरी आत्ता त्याचा दुसरा अध्याय सुरू झाल्याचा दावा काही वृत्तसंस्थांनी केला आहे. अमेरिकेबरोबरील रशियाचा तणाव वाढला असून अमेरिकेने रशियाबरोबरील ‘आयएनएफ’मधून (इंटरमिजेट न्यूक्लिअर फोर्सेस ट्रिटी) माघार घेतली आहे. अशा काळात रशियाने क्युबाबरोबर विकसित केलेले सामरिक सहकार्य नव्या भयंकर संकटाची चाहूल ठरते, असे सामरिक विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info