बलोच बंडखोरांनी पाकिस्तानची गॅस पाईपलाईन उडवून दिली – ‘बलोच लिबरेशन टायगर्स’ने जबाबदारी स्वीकारली

बलोच बंडखोरांनी पाकिस्तानची गॅस पाईपलाईन उडवून दिली – ‘बलोच लिबरेशन टायगर्स’ने जबाबदारी स्वीकारली

पाकिस्तानी यंत्रणांकडून सातत्याने होणार्‍या दडपशाही व अन्यायाविरोधात बलोचिस्तानच्या जनतेने सुरू केलेला संघर्ष आता अधिकाधिक तीव्र होत चालल्याचे संकेत मिळत आहेत. शुक्रवारी बलोच बंडखोर संघटनांनी पाकिस्तानच्या पंजाब प्रांताला पुरवठा करणार्‍या नैसर्गिक इंधनवायूच्या पाईपलाईनमध्ये भीषण स्फोट घडविला. या स्फोटात चार पाकिस्तानी सुरक्षारक्षक ठार झाले असून दोन कर्मचारी जखमी झाले. या स्फोटामुळे शुक्रवारी रात्री पंजाब प्रांताला करण्यात येणारा इंधनवायू पुरवठा काही काळ स्थगित करावा लागल्याची माहितीही समोर आली आहे.

पाकिस्तानमधील पत्रकार मिर सरमाकर बलोच यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमधून स्फोटाची माहिती उघड झाली आहे. त्यात ‘बलोच लिबरेशन टायगर्स’ या बंडखोर संघटनेने शुक्रवारी ‘सुई गॅस फिल्ड’मध्ये घडविलेल्या स्फोटाची जबाबदारी स्वीकारल्याचे सांगण्यात आले. पाकिस्तानमधील एक विश्‍लेषक तारेक फताह यांनी सोशल मीडियावर या स्फोटाबाबतचा एक व्हिडिओदेखील प्रसिद्ध केला आहे. त्यात बलोच बंडखोरांनी पंजाब प्रांतासाठी चोरण्यात येणार्‍या इंधनवायूची पाईपलाईन लक्ष्य केली, असे सांगण्यात आले आहे.

 

बलोचिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर इंधन व खनिजांचे साठे असून पाकिस्तानच्या इतर प्रांतांमध्ये याच भागातून नैसर्गिक इंधनवायू पुरविण्यात येतो. मात्र या संपत्तीचा लाभ बलोच जनतेला मिळाला नसून त्यातून पाकिस्तानी राजवटीविरोधातील भावना अधिकच भडकल्या आहेत. भारत तसेच अफगाणिस्तानने पाकिस्तानी राजवटीकडून बलोच जनतेवर होणार्‍या अत्याचारांविरोधात सतत आवाज उठविला असून त्याला समर्थनही दिले आहे.

खनिजसंपत्तीने समृद्ध असलेल्या बलोचिस्तानची पाकिस्तान सरकार व लष्कराकडून सुरू असलेल्या पिळवणूकीचा लवकरच स्फोट होईल, असा दावा केला जात होता. गेल्या आठवड्यात, बलोचिस्तानच्या ‘केच’ प्रांतातील ‘मंड’ भागात तैनात असलेल्या पाकिस्तानी लष्कराच्या सुरक्षा चौक्यांवर रॉकेट हल्ले चढविण्यात आले होते. त्यापाठोपाठ इंधनवाहिनीत घडविण्यात आलेला स्फोट बलोचिस्तान बंडखोरांचा लढा अधिक आक्रमक होत असल्याचे संकेत देणारी घटना ठरते.

 

English    हिंदी

 

इस समाचार के प्रति अपने विचार एवं अभिप्राय व्यक्त करने के लिए नीचे क्लिक करें:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info