वॉशिंग्टन – पर्यावरणाच्या र्हासामुळे होणार्या भयंकर उत्पाताचा फायदा उचलण्याची तयारी अमेरिकी लष्कराने केली आहे, असा आरोप रशियन वृत्तवाहिनी ‘आरटी’ने केला. ‘आरटी’च्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तात, अमेरिकेच्या लष्कराने प्रसिद्ध केलेल्या ‘क्लायमेट चेंज रिपोर्ट’चा हवाला देऊन आर्क्टिक क्षेत्रापासून बांगलादेशपर्यंत अमेरिका व्यापक लष्करी तैनाती करु शकतो, असा दावा करण्यात आला आहे.
गेल्याच महिन्यात अमेरिकेचे नवे लष्करप्रमुख जनरल जेम्स मॅक्कॉनव्हिल यांनी, अमेरिकी लष्कराच्या तुकड्या देशात असलेल्या तळांवर बसण्यापेक्षा जगाच्या कानाकोपर्यात तैनात होऊन संघर्षासाठी सज्ज असायला हव्यात, अशा शब्दात व्यापक मोहिमांसाठी अमेरिकेची तयारी सुरू झाल्याचे संकेत दिले होते. त्यापाठोपाठ आता हवामानबदलाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी लष्कर आंतरराष्ट्रीय स्तरावरील तैनाती वाढविण्याच्या हालचाली करीत असल्याचे समोर आले आहे.
अमेरिकी लष्कराच्या ‘आर्मी वॉर कॉलेज’ने देशातील प्रमुख संशोधक व लष्करी अधिकार्यांच्या सहाय्याने हवामानबदलाबाबत ५२ पानी अहवाल प्रसिद्ध केला आहे. ‘इम्प्लिकेशन्स ऑफ क्लायमेट चेंज फॉर द युएस आर्मी’ असे या अहवालाचे नाव आहे. या अहवालात, नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तींचा लष्करावर होणारा परिणाम, यासंदर्भातील संभाव्य घडामोडींचा अंदाज आणि लष्कराची तयारी यांची माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेतील नैसर्गिक आपत्तींमध्ये लष्कराची भूमिका आणि परदेशातील आपत्तींमधील संभाव्य हस्तक्षेप याचाही अहवालात उल्लेख आहे.
रशियन वृत्तवाहिनीने आर्क्टिक क्षेत्र तसेच बांगलादेशसारख्या आशियाई देशांमधील अमेरिकी लष्कराच्या संभाव्य तैनातीचा विशेष उल्लेख केला आहे. हवामानबदलामुळे वितळणारे आर्क्टिक क्षेत्रातील हिमनग व त्यातील प्रचंड खनिज संपत्ती यांचा उल्लेख करून आर्क्टिकवरील वर्चस्वासाठी अमेरिकी प्रशासनाने आपली क्षमता अधिक वाढवायला हवी, अशी शिफारस अहवालात करण्यात आली आहे. रशिया या क्षेत्राचे लष्करीकरण करीत असल्याचा आरोपही अहवालात असल्याचे ‘आरटी’च्या वृत्तात सांगण्यात आले आहे.
अमेरिकी लष्कराच्या अहवालात समुदाच्या वाढत्या पातळीमुळे बांगलादेशसारख्या आशियाई देशाला असणार्या धोक्याचाही उल्लेख आहे. या देशातील निर्वासितांमुळे संघर्षाला तोंड फुटू शकते व ते रोखण्यासाठी अमेरिकी लष्कर तैनात करण्याची वेळ येईल, अशी शक्यता ‘आर्मी वॉर कॉलेज’ने तयार केलेल्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |