Breaking News

सिरियातील इराणच्या वाढत्या हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेचे ‘सेंटकॉम’प्रमुख इस्रायल भेटीवर

जेरूसलेम – अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड’चे प्रमुख जनरल ‘जोसेफ वोटेल’ यांनी तातडीने इस्रायल भेट देऊन इस्रायलच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांशी चर्चा केली. या भेटीचे तपशील उघड झाले नसले तरी सिरियातील लष्करी मोहीमेची जबाबदारी असलेल्या जनरल वोटेल सिरियातील घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर इस्रायलला तातडीची भेट दिल्याचे दिसत आहे.

जनरल वोटेल यांच्या या इस्रायल भेटीबाबत गोपनियता राखण्यात आली आहे. अमेरिका तसेच इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी जनरल वोटेल यांच्या या इस्रायल भेटीविषयी बोलण्याचे टाळले. पण इस्रायलमधील एका वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, जनरल वोटेल सोमवारी इस्रायलमध्ये दाखल झाले असून त्यांनी इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख जनरल ‘गादी एश्केनोत’ तसेच इस्रायलचे सुरक्षा सल्लागार ‘मिर बेन-शाबात’ आणि इतर वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांची भेट घेतली.

गेल्या काही दिवसांपासून सिरियातील इराणच्या हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर जनरल वोटेल इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत, असा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत. गेल्या आठवड्यात सिरियात झालेल्या हवाई हल्ल्यात इराणचे तीन लष्करी तळ बेचिराख झाले होते. पुढच्या काळात सिरियातील इराणच्या तळावर असेच घणाघाती हल्ले चढविले जातील, असे इस्रायलने बजावले होते. तर इस्रायलच्या या हल्ल्यांना इराण भयंकर प्रत्युत्तर देईल, असे सांगून याची तयारी पूर्ण झाल्याची धमकी इराणने दिली आहे.

यामुळे इस्रायल आणि इराणमध्ये कुठल्याही क्षणी भीषण संघर्षाचा भडका उडेल अशी स्थिती आहे. जर या दोन देशांमध्ये युद्ध पेटले तर कुठलाही आखाती देश या युद्धापासून दूर राहू शकत नाही, असा इशारा वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि विश्‍लेषक सातत्याने देत आहेत. मुख्य म्हणजे इस्रायल व इराण देखील अशीच शक्यता वर्तवित असून एकमेकांचा विनाश घडवून आणण्याच्या गर्जना करीत आहेत. या संघर्षात रशिया इराणच्या बाजूने उभा असून त्यामुळे या संघर्षाची व्याप्ती अनेकपटींनी वाढू शकते.

या पार्श्‍वभूमीवर सिरियातील अमेरिकेच्या लष्करी मोहिमेची जबाबदारी सांभाळणार्‍या जनरल वोटेल यांच्या इस्रायल भेटीच्या मागे बरेच काही दडलेले असावे, असे संकेत मिळत आहेत.

गोलानवरील हल्ल्यानंतर इस्रायलची सिरियाच्या लष्करी तळांवर कारवाई

इस्रायलच्या ताब्यातील गोलान टेकड्यांच्या सीमारेषेत सिरियातून मॉर्टर्सचे हल्ले झाले. यानंतर इस्रायलने सिरियन लष्कराच्या तळांवर हवाई हल्ले चढवून त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘इस्रायलचे सार्वभौमत्व किंवा इस्रायली जनतेची सुरक्षा धोक्यात टाकणार्‍या हल्ल्यांना इस्रायल असेच प्रत्युत्तर देईल. इस्रायलच्या गोलान टेकड्यांवर होणार्‍या हल्ल्यांसाठी सर्वस्वी सिरियन राजवट जबाबदार असेल’, असा इशाराही इस्रायलच्या लष्कराने दिला आहे.

इस्रायलच्या लष्कराने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार सोमवारी उशीरा गोलान टेकड्यांच्या सीमारेषेतील इस्रायली सैनिकांच्या चौकीजवळ मॉर्टर हल्ले झाले. गेल्या वर्षभरात सिरियाच्या सीमारेषेतून इस्रायलच्या गोलान टेकड्यांच्या भागात होणार्‍या हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. या हल्ल्यांमागे सिरियन लष्कर तसेच सिरियात दबा धरुन बसलेले इराणचे लष्कर आणि हिजबुल्लाहचे दहशतवादी जबाबदार असल्याचा आरोप इस्रायलने केला होता.

 

English हिंदी

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info/posts/386813518393805