भारताच्या संरक्षणदलांकडून पाकिस्तानचा पर्दाफाश

भारताच्या संरक्षणदलांकडून पाकिस्तानचा पर्दाफाश

नवी दिल्ली – भारताची लढाऊ विमाने पाडण्यात पाकिस्तानी एअरफोर्सच्या धुरंधराना मोठे यश मिळाले, अशा फुशारक्या पाकिस्तानकडून बुधवारी मारण्यात आल्या होत्या. भारताची लढाऊ विमाने पाडून या देशाची आपल्या वैमानिकांनी मानहानी केली, असे दावे पाकिस्तानची माध्यमे करीत होती. पाकिस्तानच्या या जल्लोषाची हवा गुरुवारी समोर आलेल्या पुराव्यांनी काढून घेतली आहे.

भारताची ‘लढाऊ विमाने’ पाडली, पण पाकिस्तानचे काहीही नुकसान झाले नाही. या हल्ल्यासाठी ‘एफ-१६’ विमानांचा वापरच झाला नाही. म्हणूनच ‘एफ-१६’ पाडल्याचा भारतीय वायुसेनेचा दावा खोटा ठरतो, असे पाकिस्तानकडून सांगितले जात होते. तसेच ‘बालाकोट’मध्ये ‘जैश’चा तळच नव्हता, इथे भारतीय वायुसेनेने चढविलेल्या हल्ल्यात केवळ झांडांचेच नुकसान झाले, असेही पाकिस्तानकडून सांगितले जात होते. पण भारतीय वृत्तवाहिन्यांनी व त्यानंतर संरक्षणदलांनी पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश करणारे पुरावे सादर केले.

वायुसेनेचे एअरव्हाईस मार्शल आरजीके कपूर, लष्कराचे मेजर जनरल सुरेंद्रसिंग महल आणि नौदलाचे रिअर अ‍ॅडमिरल दलबिरसिंग गुजराल यांनी संध्याकाळी सात वाजता नवी दिल्लीत पत्रकार परिषद संबोधित केली. या पत्रकार परिषदेत पाकिस्तानचा मुखभंग करणारी माहिती देण्यात आली. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये भारताच्या ‘मिग-२१ बायसन’ने वेध घेतलेले ‘एफ-१६’ विमान पडल्याचा फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाला आहे. या पडलेल्या विमानाकडे पाकिस्तानचे लष्करी अधिकारी हताश होऊन पाहत असल्याचे या फोटोग्राफमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

तसेच ‘बालाकोट’मध्ये ‘जैश’चा तळ असून इथे प्रशिक्षण दिले जात होते व इथे ३०० हून अधिकजण होते, हे सिद्ध करणारे व्हिडिओज् देखील प्रसिद्ध झाले आहेत. हा प्रशिक्षण तळ युसूफ अझहरकडून चालविला जात होता व कंदहार विमान अपहरण प्रकरणाचा सूत्रधार होता, हे सारे नव्याने समोर आले आहे. ‘जैश’कडून चालविल्या जाणार्‍या मदरशाची देखभाल करणार्‍याने एका फोनकॉलवर ही माहिती दिली. त्याचे रेकॉर्डिंग भारतीय वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केले.

ही सारी माहिती दडवून भारताच्या विरोधात प्रचारयुद्ध छेडणार्‍या पाकिस्तानने आपली विश्‍वासार्हता पूर्णपणे गमावली आहे. भारतावर कुुरघोडी करण्याच्या नादात पाकिस्तानची माध्यमे व पत्रकार आपली पत गमावून बसले आहेत. भारतीय संरक्षणदलांच्या अधिकार्‍यांनी पाकिस्तानचा पर्दाफाश करीत असताना, या देशाकडून दिल्या जाणार्‍या शांततेच्या प्रस्तावाचा मुखवटा फाडून टाकला. एकीकडे भारताला शांतीचे पाठ देणारा पाकिस्तान जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर गोळीबार व तोफांचा भडीमार करीत आहे. गेल्या दोन दिवसात पाकिस्तानने तब्बल ३५ वेळा संघर्षबंदीचे उल्लंघन केले, अशी माहिती मेजर जनरल सुरेंद्रसिंग महल यांनी दिली. भारतीय लष्कर याला चोख प्रत्युत्तर देत आहे. तसेच भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा व आंतरराष्ट्रीय सीमेवर हाय अलर्ट जारी केला असून आम्ही पाकिस्तानच्या कुठल्याही आगळिकीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचे मेजर जनरल महल यांनी बजावले आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info