ग्रीस व तुर्कीमध्ये संघर्षाचा भडका उडू शकतो – विश्‍लेषकांचा इशारा

ग्रीस व तुर्कीमध्ये संघर्षाचा भडका उडू शकतो – विश्‍लेषकांचा इशारा

अथेन्स/अंकारा – तुर्कीने आपल्या सागरी क्षेत्रासंदर्भात लिबियाबरोबर केलेला करार ग्रीस व तुर्कीमध्ये संघर्षाचा भडका उडविणारा ठरेल, असा इशारा विश्‍लेषकांनी दिला आहे. गेल्या आठवड्यात तुर्कीने लिबियाबरोबर करार करताना भूमध्य समुद्रातील मोठ्या भागावर आपला ताबा असल्याचे नमूद केले होते. याच भागावर ग्रीसही दावा सांगत असल्याने या मुद्यावरून ग्रीस व तुर्की आमनेसामने ठाकण्याची शक्यता बळावली आहे.

ग्रीस, संघर्ष, रेसेप एर्दोगन, इंधनाचे साठे, कारवाई, तुर्की, अमेरिकायुरोपिय महासंघाचे सदस्यत्त्व, निर्वासितांचे लोंढे व भूमध्य सागरी क्षेत्रावरील ताबा यासारख्या मुद्यांवरून गेली अनेक वर्षे ग्रीस व तुर्कीमध्ये धुसफूस सुरू आहे. गेल्या दशकभरात तुर्कीवर आपली पकड बसविणार्‍या राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी या मुद्यांवर आक्रमक भूमिका घेतली असून ग्रीस, सायप्रस यासारख्या देशांवर दादागिरी करण्यास सुरुवात केली आहे. तुर्कीच्या या दादागिरीला प्रत्युत्तर देण्यासाठी ग्रीसने यापूर्वी आपल्या युद्धनौका भूमध्य सागरात तैनातही केल्या होत्या.

ग्रीस, संघर्ष, रेसेप एर्दोगन, इंधनाचे साठे, कारवाई, तुर्की, अमेरिकातुर्की, ग्रीस व सायप्रस या देशांमधील भूमध्य सागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर इंधनाचे साठे असल्याचे सांगण्यात येते. या साठ्यांवर दावा सांगण्यासाठी तुर्कीची धडपड सुरू आहे. गेल्या काही वर्षात तुर्कीने आपली इंधन उत्खनन करणारी जहाजे या भागात पाठवून सर्वेक्षणही केले होते. या जहाजांबरोबर तुर्कीने युद्धनौकाही पाठविल्या होत्या. तुर्कीची ही आक्रमकता युरोपिय महासंघ तसेच नाटोला नाराज करणारी ठरली आहे. त्यामुळे नाटो व महासंघ या दोन्ही गटांकडून तुर्कीला यापूर्वीच गंभीर समज देण्यात आली होती.

मात्र तरीही लिबियाबरोबर करार करून तुर्कीने ग्रीसची नव्याने कुरापत काढल्याचे दिसत आहे. तुर्की-लिबिया करारानंतर ग्रीसने लिबियाविरोधातही कारवाईचा इशारा दिला असून त्यांच्या राजदूतांची हकालपट्टी केली आहे. ग्रीक पंतप्रधानांनी नुकत्याच झालेल्या नाटो बैठकीदरम्यान आपली नाराजी तुर्की राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्यासमोर स्पष्टपणे बोलून दाखविली. मात्र या चर्चेत कोणताही तोडगा निघाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ग्रीस, संघर्ष, रेसेप एर्दोगन, इंधनाचे साठे, कारवाई, तुर्की, अमेरिकात्याचवेळी भूमध्य सागरातील भागाच्या सुरक्षेसाठी ग्रीसने सर्व पातळ्यांवर पूर्ण तयारी केल्याचा इशारा ग्रीसच्या संरक्षणमंत्र्यांनी दिला आहे. तर ग्रीसच्या नौदलप्रमुखांनी यापुढे इतर देशांची वाट न बघता ग्रीक नौदल स्वतःहून ‘ऍक्शन’ घेईल, असे बजावले आहे. ग्रीसच्या सत्ताधारी आघाडीचे संसद सदस्य अँजेलॉस सिरिगॉस यांनी ग्रीक नौदलाने भूमध्य सागरात आपल्या युद्धनौका रवाना केल्याचाही दावा केला आहे.

दोन महिन्यांपूर्वीच अमेरिकेने ग्रीसबरोबर दीर्घकालिन संरक्षण सहकार्य करार केला असून त्यात नव्या संरक्षणतळासह ‘ड्रोन बेसेस’ उभारण्याच्या तरतुदीचा समावेश होता. या करारामागे तुर्कीची आक्रमकता हादेखील प्रमुख घटक होता, असे सांगण्यात आले होते. युरोपमधील ग्रीस व भूमध्य समुद्रातील सायप्रस हे अमेरिकेचे मित्रदेश असून त्यांच्याबरोबर तुर्कीचे असणारे वादही अमेरिकेसाठी चिंतेचा विषय असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी ग्रीसबरोबरील करारादरम्यान स्पष्ट केले होते.

ग्रीस, संघर्ष, रेसेप एर्दोगन, इंधनाचे साठे, कारवाई, तुर्की, अमेरिका

तुर्कीबरोबरील वादात इस्रायलचे ग्रीसला समर्थन

जेरुसलेम – तुर्की व लिबियामध्ये सागरी हद्दीबाबत झालेल्या कराराच्या मुद्यावर इस्रायलने ग्रीसला समर्थन देत असल्याचे जाहीर केले आहे. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडियावर टाकलेल्या एका पोस्टमधून यासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली.

‘इस्रायलचा ग्रीसला पूर्ण पाठिंबा असून सागरी हद्दीच्या मुद्यावर आम्ही ग्रीसच्या मागे ठामपणे उभे राहू. ग्रीसच्या सागरी हद्दीचे कोणी उल्लंघन केल्यास त्याविरोधात ग्रीसच्या अधिकाराचे इस्रायल समर्थन करतो. ग्रीसबरोबरील भागीदारी इस्रायलसाठी अत्यंत महत्त्वाची आहे’, असे इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.

त्याचवेळी तुर्कीकडून भूमध्य सागरी क्षेत्रात सुरू असलेल्या हालचालींवर इस्रायलचे लक्ष असल्याचे नमूद करून त्याबाबत तीव्र चिंताही व्यक्त करण्यात आली आहे.

English

हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info