सीआयए रशिया व इराणवर लक्ष केंद्रित करणार – गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुख जिना हॅस्पेल

सीआयए रशिया व इराणवर लक्ष केंद्रित करणार – गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुख जिना हॅस्पेल

वॉशिंग्टन – ‘९/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सीआयएने पुढील अनेक वर्षे आपले लक्ष दहशतवादविरोधी मोहिमेवर केंद्रित केले होते. त्यामुळे इतर मुद्यांवर आम्ही मागे पडलो होतो. मात्र त्यानंतर आता सीआयएने आपले लक्ष पुन्हा एकदा रशिया व इराणवर केंद्रीत केले असून त्यातील गुंतवणूक वाढली आहे. या आघाडीवर अजून बरेच काम बाकी असले तरी सीआयएने त्यावर चांगली प्रगती केली आहे’, अशा शब्दात ‘सीआयए’च्या प्रमुख जिना हॅस्पेल यांनी अमेरिकी गुप्तचर यंत्रणा यापुढे रशिया आणि इराणविरोधातील कारवायांवर अधिक भर देईल, असे संकेत दिले आहेत.

सीआयए, रशिया व इराणवर लक्ष केंद्रित केल्याचे संकेत, जिना हॅस्पेल, अमेरिकी गुप्तचर यंत्रणा, दहशतवादविरोधी कारवाई, अमेरिका, चीनअमेरिकी गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’च्या प्रमुख हॅस्पेल यांनी अलाबामामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रीय सुरक्षा व गुप्तचर यंत्रणेची भूमिका याबाबत वक्तव्ये केली. त्यात नजिकच्या काळात ‘सीआयए’च्या उद्दिष्टांमध्ये होणारे बदल, आव्हाने, अमेरिकेसमोर असलेले धोके अशा विविध मुद्यांचाही समावेश होता. यावेळी ‘सीआयए’च्या प्रमुखांनी येणार्‍या काळात दहशतवादविरोधी कारवाईऐवजी अमेरिकेच्या प्रतिस्पर्धी देशांविरोधात पारंपरिक हेरगिरी कारवायांवर भर दिला जाईल, असे संकेत दिले.

सीआयए, रशिया व इराणवर लक्ष केंद्रित केल्याचे संकेत, जिना हॅस्पेल, अमेरिकी गुप्तचर यंत्रणा, दहशतवादविरोधी कारवाई, अमेरिका, चीनगेल्या शतकाच्या अखेरच्या दशकांमध्ये अमेरिकी गुप्तचर यंत्रणेने प्रामुख्याने रशिया व रशियाचे समर्थक असलेल्या देशांवर आपले लक्ष केंद्रित केले होते. २००१ साली अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर ‘सीआयए’ने दहशतवादविरोधी कारवाया व आखाती देशांवर भर दिला होता. त्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका ठरु शकणार्‍या इतर मुद्यांकडे दुर्लक्ष झाले, असा दावा अमेरिकी वर्तुळातून करण्यात येतो.

‘सीआयए’च्या दुर्लक्षामुळे रशिया २०१४ साली क्रिमिआत आक्रमण करु शकली तसेच २०१६ साली अमेरिकेतील निवडणुकांमध्ये हस्तक्षेप झाला, असा आरोपही विश्‍लेषकांकडून सातत्याने करण्यात येतो. याची दखल घेऊन अमेरिकी गुप्तचर यंत्रणेने पुन्हा एकदा चीनसह रशिया व इराणवर भर देण्यास सुरुवात केली असून या देशांवर अधिक बारकाईने लक्ष ठेवण्याचे संकेत दिले आहेत. गेल्यावर्षी झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान चीन अमेरिकेचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे असे सांगून चीनच्या या हालचालींवर सीआयएची नजर रोखलेली आहे, असे हॅस्पेल यांनी बजावले होते.

त्यानंतर आता रशिया व इराणकडे अधिक लक्ष देण्यात येत असल्याचे वक्तव्य करून अमेरिकेच्या सुरक्षेला ‘चीन-रशिया-इराण’ या त्रिकुटाचा सर्वाधिक धोका असल्याची जाणीव ‘सीआयए’ने करून दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारादरम्यान रशियाचा हस्तक्षेप झालेला नाही, असा अहवाल समोर येत असतानाच हॅस्पेल यांनी रशिया व इराणवर लक्ष केंद्रित केल्याचे संकेत देणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info