कोरोना हायरसची साथ रोख यासाठी अमेरिकेत ‘नॅशनल इम सी’ची घोषणा – ५० अब्ज डॉलर्सचे अतिरिक्त अर्थसहाय्य जाहीर

कोरोना हायरसची साथ रोख यासाठी अमेरिकेत ‘नॅशनल इम सी’ची घोषणा – ५० अब्ज डॉलर्सचे अतिरिक्त अर्थसहाय्य जाहीर

वॉशिंग्टन – जागतिक आरोग्य संघटनेने ‘कोरोनाव्हायरस’ला महामारी म्हणून घोषित केल्यानंतर अमेरिकेनेही ही साथ रोखण्यासाठी वेगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘कोरोनाव्हायरस’ची साथ रोखण्यासाठी देशात ‘नॅशनल इमर्जन्सी’ची घोषणा करण्यात येत असल्याचे जाहीर केले. ‘नॅशनल इमर्जन्सी’ची घोषणा करतानाच अमेरिकेतील राज्ये तसेच स्थानिक प्रशासनाला ५० अब्ज डॉलर्सचे अतिरिक्त अर्थसहाय्यही जाहीर करण्यात आले आहे.

‘कोरोनाव्हायरसची साथ रोखण्यासाठी अमेरिका सर्वशक्तीनिशी प्रयत्न करणार आहे. याच उद्देशाने आपण राष्ट्रीय आणीबाणी घोषित करीत आहोत’, असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले. यावेळी ट्रम्प यांनी अमेरिकेच्या आरोग्य मंत्र्यांना ‘इमर्जन्सी पॉवर्स’ देत असल्याचेही स्पष्ट केले. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या या घोषणेचे सकारात्मक पडसाद अमेरिकी शेअरबाजारांमध्ये उमटले असून शुक्रवारच्या व्यवहारांमध्ये निर्देशांक नऊ टक्क्यांनी उसळल्याचे समोर आले. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने शेअरबाजारांची ऐतिहासिक घसरण रोखण्यासाठी यापूर्वीच सुमारे दीड ट्रिलियन डॉलर्सच्या सहाय्याची घोषणा केली होती.

अमेरिकेच्या ५० राज्यांमध्ये ‘कोरोनाव्हायरस’ची साथ पसरली असून २,२९९ रुग्णांची नोंद झाली आहे. साथीत बळी गेलेल्यांची संख्या ५०च्या वर गेली आहे. अमेरिकेच्या आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच अधिकार्‍यांनी देशातील रुग्ण तसेच बळींची संख्या प्रचंड वेगाने वाढू शकते, असे इशारे सातत्याने देण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या ओहिओ प्रांतातील आरोग्य प्रमुखांनी राज्यात ‘कोरोनाव्हायरस’च्या साथीचे एक लाख रुग्ण असू शकतात, अशी भीती व्यक्त केली होती.

या पार्श्‍वभूमीवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा महत्त्वाची ठरते. आणीबाणी घोषित करण्यापूर्वी ट्रम्प यांनी शुक्रवारी रात्रीपासून युरोपातील प्रवाशांवर ‘ट्रॅव्हल बॅन’ लादण्याचाही निर्णय जाहीर केला होता. युरोपातून येणारी तसेच युरोपात जाणारी सर्व विमान उड्डाणे तब्बल एक महिन्यासाठी रद्द करण्यात आली आहेत. त्याचे युरोपिय देशांमधून आक्रमक पडसाद उमटले होते. मात्र ट्रम्प यांनी आपण निर्णयावर ठाम असल्याचे सांगत यापूर्वी चीनवर लादलेल्या प्रवासबंदीचेही समर्थन केले होते.

आणीबाणीची घोषणा करताना ट्रम्प यांनी नागरिकांनी घाबरू नये आणि अमेरिकी आरोग्य विभागाच्या वेबसाईटवरून आवश्यक माहिती घेऊन मग पुढे पावले उचलावीत, असे आवाहन केले आहे. त्याचवेळी आपण स्वतः पुढील काही दिवसात ‘कोरोनाव्हायरस’ची चाचणी करु, असे संकेतही दिले आहेत. गेल्या काही दिवसात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या संपर्कात आलेल्या लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकार्‍यांना साथीची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे ट्रम्प यांनीही चाचणी करून घ्यावी, अशी मागणी करण्यात येत होती.

ट्रम्प यांची मुलगी इव्हांका ट्रम्प यांनी ‘कोरोनाव्हायरस’ साथीच्या पार्श्‍वभूमीवर ‘सेल्फ आयसोलेशन’मध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले आहे.

‘कोरोना हायरस’ या पार्श्‍वभूमीवर ट्रम्प याकडून ‘नॅशनल डे ऑफ रेयर’ची घोषणा

वॉशिंग्टन – रविवार, १५ मार्च रोजी ‘नॅशनल डे ऑफ प्रेयर’ची घोषणा करणे ही माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची बाब आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. ‘अमेरिकेच्या इतिहासात आपण सर्वांनी देशाची सुरक्षा व सामर्थ्यासाठी कायम ईश्‍वरावर श्रद्धा ठेवली आहे. अमेरिकेचे नागरिक कुठेही असतील तरी त्यांनी रविवारी धार्मिक कार्य म्हणून प्रार्थनेसाठी वेळ द्यावा. आपण सर्वजण एकत्र आल्यास नक्कीच विजय मिळवू शकतो’, अशा शब्दात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकी जनतेला प्रार्थनेसाठी आवाहन केले.

अमेरिकेत दरवर्षी मे महिन्यातील पहिल्या गुरुवारी ‘नॅशनल डे ऑफ प्रेयर’ पाळण्यात येतो. मात्र या साथीच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी त्यात बदल केला आहे. 

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info