कोरोनामुळे युरोपात निर्वासितांचे नवे लोंढे धडकतील – युरोपियन यंत्रणेचा इशारा

कोरोनामुळे युरोपात निर्वासितांचे नवे लोंढे धडकतील  – युरोपियन यंत्रणेचा इशारा

ब्रुसेल्स – कोरोनाच्या साथीमुळे आखाती देश व आफ्रिकेतील स्थिती अधिकच बिघडण्याची शक्यता असून या देशांमधून निर्वासितांचे नवे लोंढे युरोपात धडकू शकतात, असा इशारा युरोपियन यंत्रणेने दिला आहे. साथ नियंत्रणात आणण्यासाठी युरोपिय देशांमष्ये सध्या लॉकडाउन लागू असल्याने निर्वासितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घाट झाली आहे. मात्र येत्या काही महिन्यात ही परिस्थिती बदलू शकते, असा दावा ‘युरोपियन असायलम सपोर्ट ऑफिस’ने(इएएसओ) केला.

‘सध्या कोरोनाच्या साथीमुळे सर्व प्रकारचा प्रवास जवळपास ठप्प झाला आहे. त्यामुळे मार्च महिना व त्यानंतरच्या काळात निर्वासितांचे प्रमाण ५० टक्क्यांहून खाली आले आहे. पण युरोपात येणाऱ्या निर्वासितांचे मूळ असणाऱ्या देशांमध्ये साथीचा व त्यानंतरच्या परिणामांचा धोका मोठा आहे. त्यामुळे पुन्हा निर्वासितांचे लोंढे युरोपात येऊ शकतात’, असा इशारा ‘इएएसओ’ने आपल्या नव्या अहवालात दिला आहे.

आखाती तसेच आफ्रिकी देशांमध्ये कोरोना साथीने भयंकर थैमान घातले असून त्यात हजारो जणांचे बळी गेले आहेत.  या देशांमध्ये आरोग्यविषयक सुविधा अपुऱ्या असल्याने तसेच अर्थव्यवस्था मंदावल्याने अन्नटंचाई, असुरक्षितता, अस्थैर्य यासारख्या समस्या अधिक तीव्र होऊ शकतात. त्याचवेळी ‘आयएस‘सारखे दहशतवादी गटही प्रबळ होण्याची शक्यता आहे. याची परिणिती त्या देशांमधील नागरिक पुन्हा एकदा युरोपकडे धाव घेण्यात होईल, अशी चिंता युरोपियन यंत्रणेने व्यक्त केली.

२०१५ सालापासून युरोपात मोठ्या प्रमाणात निर्वासितांचे लोंढे घुसत आहेत. त्यावर नियंत्रण मिळविण्यात युरोपिय देशाना सपशेल अपयश आले आहे. या अपयशाचे फार मोठे सामाजिक व राजकीय परिणाम युरोपिय देशांमध्ये दिसून आले आहेत.

गेले दोन महिने कोरोनाच्या साथीवर नियंत्रण मिळविण्याआठी धडपडणाऱ्या युरोपला निर्वासितांच्या लोंढ्यातून तात्पुरता दिलासा मिळाला होता. मात्र पुढील काळात निर्वासितांच्या घुसखोरीचे संकट अधिकच तीव्र होईल, असे संकेत नव्या अहवालातून मिळत आहेत.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info