अफगाणिस्तानकडे पाठ फिरवणे अमेरिकेला परवडणार नाही – अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री रॉबर्ट गेट्स

अफगाणिस्तानकडे पाठ फिरवणे अमेरिकेला परवडणार नाही – अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री रॉबर्ट गेट्स

अफगाणिस्तानकडे पाठ

वॉशिंग्टन – अफगाणिस्तानातील संघर्ष लवकरात लवकर संपवून टाका, असे बहुतांश अमेरिकी जनतेला वाटते. मात्र त्यासाठी आपण अफगाणिस्तानकडे पाठ फिरवली तर ते अमेरिकेच्या हिताचे ठरणार नाही. कारण तसे केले तर अफगाणिस्तानातील पोकळीचा फायदा घेऊन तालिबान येथे पुन्हा आपली राजवट प्रस्थापित करील. त्यासाठी पाकिस्तान आणि चीन तालिबानला सहाय्य करतील, असा इशारा अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री रॉबर्ट गेट्स यांनी दिला. त्याचबरोबर तालिबानला अफगाणिस्तानातून पिटाळून लावल्यानंतर तालिबान पाकिस्तानात संघटीत झाली, याकडे अमेरिकेचे दुर्लक्ष झाले, अशी टीका गेट्स यांनी केली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अफगाणिस्तानातील सैन्यमाघार घोषित करून एक महिना झाला आहे. ११ सप्टेंबरपर्यंत ही सैन्यमाघार पूर्ण होईल. अफगाणिस्तानातील अमेरिकेची ही सैन्यमाघार सुरू झालेली असताना, तालिबानच्या हल्ल्यांमध्येही वाढ झाली आहे. मंगळवारी तालिबानने अफगानिस्तानच्या पूर्वेकडील जलालाबाद शहरात आरोग्यसेवकांवर गोळीबार करून चार जणांचा बळी घेतला. शहरातील मुलांसाठी पल्स पोलिओचे डोस देणार्‍या आरोग्यसेवकांना तालिबानने लक्ष्य केले.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/us-cannot-afford-to-turn-its-back-on-afghanistan/