Breaking News

पुढच्या महिन्यात अमेरिका इराणवर हल्ला चढविणार – ऑस्ट्रेलियन वृत्तवाहिनीचा दावा

कॅनबेरा – इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ल्याची अमेरिकेची तयारी झाली असून तसा निर्णयही अमेरिकेने घेतला आहे. त्यानुसार पुढच्या महिन्यात अमेरिका इराणच्या अणुप्रकल्पावर हल्ला चढविल, असा दावा ऑस्ट्रेलियन वृत्तवाहिनीने केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या अधिकार्‍याने पंतप्रधान टर्नबुल यांचा हवाला देऊन ही माहिती दिल्याचे सदर वृत्तवाहिनीने म्हटले आहे. तसेच इराणवरील या हल्ल्यासाठी ऑस्ट्रेलिया देखील अमेरिकेला सहाय्य करणार असल्याचे या वृत्तवाहिनीने म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियन वृत्तवाहिनी, दावा, टर्नबुल, अणुप्रकल्प, अमेरिका, हल्ला, इराण, ब्रिटनइराणवर कठोर कारवाईच्या धमक्या देणार्‍या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चार दिवसांपूर्वी इराणशी वाटाघाटी होऊ शकतात, असे संकेत दिले होते. यानंतर ऑस्ट्रेलियन वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेली ही बातमी इराणने वाटाघाटींचा प्रस्ताव नाकारल्यास काय घडू शकते, याची जाणिव करून देत आहे.

इराणच्या वादग्रस्त अणुकार्यक्रमाशी संबंधित ठिकाणांवर हल्ले चढविण्याची पूर्ण तयारी अमेरिकेने केली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या एका इशार्‍यावर अमेरिका इराणवर हल्ला करू शकतो. असे झाले तर त्याचे परिणाम आखाती देशांमध्ये पहायला मिळतील, असा इशारा ऑस्ट्रेलियन अधिकार्‍याने दिला. इराणवरील या हल्ल्यासाठी ऑस्ट्रेलिया अमेरिकेला सहाय्य करील, असेही सदर अधिकार्‍याने सांगितल्याची माहिती या वृत्तवाहिनीने दिली.

यासाठी ऑस्ट्रेलिया आपल्या उत्तरेकडील ‘पाईन गॅप’ येथील गुप्तचर विभागाच्या तळाचा वापर करू शकतो. या तळावरुन ऑस्ट्रेलियन गुप्तचर विभाग इराणमधील अणुप्रकल्प आणि लष्करी तळांची माहिती अमेरिकेच्या हेरगिरी उपग्रहांना पुरवू शकतो. ऑस्ट्रेलियाप्रमाणे ब्रिटन देखील या इराणविरोधी हल्ल्यात इतकेच सहाय्य करील. अमेरिकेच्या बरोबरीने इराणवरील हल्ल्यात ब्रिटन किंवा ऑस्ट्रेलिया थेट सहभागी नसेल असे या अधिकार्‍याने स्पष्ट केले.

ऑस्ट्रेलियन वृत्तवाहिनी, दावा, टर्नबुल, अणुप्रकल्प, अमेरिका, हल्ला, इराण, ब्रिटनसदर अधिकार्‍याने ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या हवाल्याने ही माहिती दिली असली तरी पंतप्रधान टर्नबुल यांनी मात्र सदर वृत्त फेटाळले. ‘राष्ट्राध्य ट्रम्प यांनी इराणबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पण अमेरिका इराणवर हल्ला चढविल, असे वाटत नाही’, अशी प्रतिक्रिया टर्नबुल यांनी दिली. तर ऑस्ट्रेलियन परराष्ट्रमंत्री जुली बिशप यांनी इराणला या क्षेत्रातील शांती व स्थैर्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणच्या अणुकरारावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. दोन महिन्यांपूर्वी इराणबरोबरच्या अणुकरारातून माघार घेतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणवर कठोर निर्बंध लादले आहेत. तसेच इराणने अमेरिकेच्या मागण्या मान्य केल्या नाही तर इतिहासात कुणीही अनुभवले नसतील, अशा परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकीही अमेरिकेने दिली आहे. पण ट्रम्प यांनी आतापर्यंत इराणविरोधात थेट लष्करी कारवाईचे संकेत दिले नव्हते.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info