व्हेनेझुएलातील परिस्थिती अधिकच चिघळली: ब्राझिलकडून सीमेवर लष्कर तैनात; इक्वेडोर व पेरूकडून व्हेनेझुएलाच्या नागरिकांवर निर्बंध

व्हेनेझुएलातील परिस्थिती अधिकच चिघळली: ब्राझिलकडून सीमेवर लष्कर तैनात; इक्वेडोर व पेरूकडून व्हेनेझुएलाच्या नागरिकांवर निर्बंध

ब्रासिलिया/कॅराकस – नव्या चलनाची घोषणा करून अर्थव्यवस्था सावरण्याचे दावे करणार्‍या व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांसमोरील संकटे अधिकच वाढली आहेत. लॅटिन अमेरिकेतील शेजारी देशांनी व्हेनेझुएलाविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून ब्राझिलने व्हेनेझुएलातून येणार्‍या नागरिकांना रोखण्यासाठी सीमेवर लष्कर तैनात केले. तर इक्वेडोर व पेरुने आपल्या देशात येऊ पाहणार्‍या व्हेनेझुएलातील नागरिकांवर नवे निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे महागाई, जीवनावश्यक वस्तूंची टंचाई, चलनवाढ व दडपशाहीने त्रासलेल्या व्हेनेझुएलातील जनतेला भयंकर समस्यांचा सामना करावा लागत आहे.

ब्राझिल, तैनात, बोलिव्हर, चलन, लष्कर, इंधन, पेरू, निर्बंध, ww3, व्हेनेझुएला, अमेरिकालॅटिन अमेरिकेतील इंधनसंपन्न देश असलेला व्हेनेझुएलाला सध्या भयंकर आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. २०१४ सालापासून व्हेनेझुएलात आर्थिक मंदी असून इंधनदरांमधील घसरण व अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांनंतर या मंदीचे तडाखे अधिकच तीव्र होऊ लागले आहेत. दोन वर्षांपूर्वी जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य व औषधांसाठी तब्बल एक लाख नागरिकांनी कोलंबियात स्थलांतर केल्याच्या घटनेने खळबळ उडवली होती. मात्र त्यानंतरही व्हेनेझुएला सोडून जाणार्‍यांची संख्या सातत्याने वाढत असून ही संख्या तब्बल २३ लाखांवर गेल्याचे मानण्यात येते.

व्हेनेझुएलाचे चलन असलेल्या ‘बोलिव्हर’मध्ये अभूतपूर्व घसरण झाली असून चलनवाढ तब्बल १० लाख टक्क्यांपर्यंत जाण्याची भीती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केली आहे. व्हेनेझुएलातील आर्थिक तूट ‘जीडीपी’च्या २० टक्क्यांवर गेली असून कर्जाचा आकडा तब्बल १५० अब्ज डॉलर्सवर गेला आहे. देशाच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन असलेल्या इंधन उत्पादनातही मोठी घट झाली असून ते तीन दशकांमधील नीचांकी पातळीवर घसरले आहे.

ब्राझिल, तैनात, बोलिव्हर, चलन, लष्कर, इंधन, पेरू, निर्बंध, ww3, व्हेनेझुएला, अमेरिकाया आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुरो यांनी सुरुवातीला इंधनावर आधारलेल्या ‘पेट्रो’ या ‘क्रिप्टोकरन्सी’ची घोषणा केली होती. मात्र हे चलन म्हणजे एक ‘घोटाळा’ असल्याचा आरोप आंतरराष्ट्रीय गटांकडून करण्यात येत असून त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. ‘पेट्रो’च्या अपयशानंतर राष्ट्राध्यक्ष मदुरो यांनी नव्या ‘बोलिव्हर’ चलनाची घोषणा केली असून सोमवारपासून हे चलन कार्यरत झाल्याचा दावा केला आहे. हे चलन यापूर्वी अपयशी ठरलेल्या ‘पेट्रो’ चलनाशी जोडल्याचे सांगण्यात येते.

मात्र मदुरो यांनी केलेल्या उपाययोजनांमुळे व्हेनेझुएलातील जनतेच्या स्थितीत काहीही फरक पडलेला नाही. उलट आतापर्यंत कमी असलेले इंधनाचे दर वाढविल्याने जनतेत अधिकच नाराजीची भावना आहे. त्यातच अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंची टंचाई असल्याने ते मिळविण्यासाठी रोज लांब रांगा लावणे भाग पडत असून लुटमार व गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे.

त्यामुळे देश सोडून जाणार्‍या नागरिकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मात्र व्हेनेझुएलन नागरिकांना आश्रय देणार्‍या ब्राझिल, कोलंबिया, इक्वेडोर व पेरु यासारख्या देशांनी व्हेनेझुएलातील निर्वासितांचे लोंढे रोखण्यासाठी आक्रमक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.

English  हिंदी

Click below to express your thoughts and views on this news:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info