Breaking News

रशिया एझोव्ह समुद्राचा ताबा घेत आहे – युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा आरोप

मारीपोल – पूर्व युक्रेनच्या नियंत्रणासाठी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेला संघर्ष थेट ‘एझोव्ह’च्या समुद्रापर्यंत पोहोचला आहे. युक्रेनने ‘एझोव्ह’ च्या क्षेत्रात नौदलासाठी नवा तळ उभारणार असून येत्या वर्षअखेरीपर्यंत सदर नौदलतळ कार्यान्वित होईल, अशी घोषणा राष्ट्राध्यक्ष ‘पेट्रो पोरोशेन्को’ यांनी केली. प्रत्युत्तर म्हणून रशियाने येथील वादग्रस्त भागात पूल बांधण्यास सुरुवात केली असून युक्रेनच्या जहाजांना ‘एझोव्ह’च्या समुद्रात प्रवेश नाकारण्यास सुरुवात केली आहे. याचा दाखला देऊन युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी रशिया एझोव्हचे समुद्र ताब्यात घेण्याच्या तयारीत असल्याचा आरोप केला.

‘एझोव्ह’, ताबा, पेट्रो पोरोशेन्को, एझोव्ह समुद्र, युक्रेन, बांधकाम, रशिया, world war 3, युरोपिय महासंघ

दशकभरापूर्वी रशिया आणि युक्रेनमध्ये झालेल्या करारानुसार, ‘एझोव्ह’चे समुद्र दोन्ही देशांच्या जहाजांसाठी मोकळे असणार होते. पण गेल्या काही महिन्यांपासून ‘एझोव्ह’च्या समुद्रातील तणाव वाढला असून रशिया या सागरी क्षेत्राचा ताबा घेण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप युक्रेनचे पोरोशेन्को सरकार करीत आहे. रशियाने ‘कर्च’च्या आखातात प्रवासबंदी लागू केल्यामुळे युक्रेनच्या व्यापारी जहाजांचे सागरी वाहतुकीचे स्वातंत्र्य धोक्यात आल्याची टीका युक्रेनने केली आहे.

रशियाच्या या भूमिकेवर अमेरिका आणि युरोपिय महासंघांनी आक्षेप घेतला आहे. युक्रेनच्या व्यापारी जहाजांची कोंडी करून रशिया युक्रेनला अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी केला होता. त्याचबरोबर रशियाने ‘एझोव्ह’च्या समुद्रावरील प्रवासबंदी मागे घ्यावी, अशी मागणी अमेरिकेने केली होती. तर रशियाने लागू केलेली प्रवासबंदी युक्रेनबरोबर युरोपिय देशांच्या जहाजांचीही अडवणूक करणारी असल्याची टीका युरोपिय महासंघाने केली. मात्र रशिया ‘एझोव्ह’च्या समुद्रावरील प्रवासबंदीच्या आपल्या निर्णयावर ठाम आहे.

पाच वर्षांपूर्वी युक्रेनबरोबरच्या संघर्षात ‘क्रिमिआ’वर ताबा घेतल्यानंतर रशियाने क्रिमिआला जोडण्यासाठी ‘कर्च’ येथे मोठा पूल बांधण्यास सुरुवात केली आहे. पण क्रिमिआ हा आपलाच भूभाग असून रशियाने तो बळकावल्याचा आरोप करणार्‍या युक्रेनने सदर बांधकामाला कडाडून विरोध केला आहे. पाश्‍चिमात्य देशांनीही रशियाच्या या बांधकामावर आक्षेप घेतला होता. तरीही रशियाने या भागातील बांधकाम सुरू ठेवले आहे.

English    हिंदी

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info