अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत चीनचा हस्तक्षेप – राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा गंभीर आरोप

अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत चीनचा हस्तक्षेप – राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा गंभीर आरोप

वॉशिंग्टन – ‘येत्या नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत होणार्‍या मध्यावधी निवडणुकांमध्ये चीन ढवळाढवळ करून माझ्या प्रशासनाविरोधात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे’, असा खळबळजनक आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. व्यापाराच्या मुद्यावर आव्हान दिल्याने चीनला मी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी नको असून त्यासाठीच या सर्व हालचाली सुरू आहेत, असेही ट्रम्प यांनी आपल्या आरोपात म्हटले आहे. ट्रम्प सुरक्षा परिषदेत चीनच्या हस्तक्षेपाचा मुद्दा मांडत असतानाच अमेरिकेचे गुप्तचर प्रमुख ‘डॅन कोट्स’ यांनीही अमेरिकेच्या सायबरसुरक्षेला चीनचा धोका वाढल्याचे बजावले.

मध्यावधी निवडणुक, हस्तक्षेप, UNSC meeting, चीन, जाहिरातबाजी, US, आशिया-पॅसिफिकअमेरिकेत २०१८ साली झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये रशियाने हस्तक्षेप केल्याचे आरोप ट्रम्प यांच्या विरोधकांनी केले होते. याप्रकरणी ट्रम्प यांच्या निकटवर्तियांची चौकशीही सुरू असून अमेरिकी यंत्रणांनी प्राथमिक अहवालांमध्ये रशियाचा हात असल्याचे दावे केले आहेत. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मध्यावधी निवडणुकांमध्ये चीन ढवळाढवळ करीत असल्याबाबत केलेले आरोप लक्ष वेधून घेणारे ठरतात. आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी चीनने दिलेल्या उघड धमक्या तसेच अमेरिकी दैनिकांमधून प्रसिद्ध होणारे लेख यांचा दाखला दिला.

‘चीनकडून देस मॉईन्स रजिस्टर व इतर दैनिकांमध्ये बातम्यांच्या स्वरुपात जोरदार जाहिरातबाजी व माहितीचा मारा सुरू आहे’, असा आरोप ट्रम्प यांनी केला. सुरक्षा परिषदेच्या बैठकीत अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी चीनला लक्ष्य केले. ‘मी किंवा माझ्या नेतृत्त्वाखालील सरकारला विजय मिळावा, अशी चीनची इच्छा नाही. मी चीनला व्यापाराच्या मुद्यावर आव्हान देणारा पहिला राष्ट्राध्यक्ष असल्याने चीनला नकोसा झालो आहे. अमेरिका व्यापारात जिंकते आहे. प्रत्येक स्तरावर अमेरिकेला यश मिळते आहे’, अशा शब्दात ट्रम्प यांनी चीनकडून सुरू असलेल्या हस्तक्षेपामागील पार्श्‍वभूमी स्पष्ट केली.

गेल्या आठवड्यातही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मध्यावधी निवडणुकांच्या मुद्यावरून चीनला लक्ष्य केले होते. त्यात चीनकडून, आपल्या पाठीशी उभ्या असणार्‍या अमेरिकेतील शेतकरी व कामगारवर्गाला लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप केला होता. या माध्यमातून चीनला मध्यावधी निवडणुकांचे निकाल बदलायचे असून त्यांनी उघडपणे तसेच धमकावल्याचेही ट्रम्प यांनी बजावले होते. चीनने अमेरिकेबरोबरील व्यापारयुद्धात अमेरिकी उत्पादनांना लक्ष्य करताना ट्रम्प यांना पाठिंबा देणार्‍या राज्यांमधील उद्योगांना सर्वाधिक फटका बसेल, अशा रितीने कारवाई केल्याचे उघड झाले होते.

दरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प चीनला सुरक्षा परिषदेत लक्ष्य करीत असतानाच, अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख ‘डॅन कोट्स’ यांनी, चीन अमेरिकेच्या सायबरसुरक्षेला असलेला सर्वात मोठा धोका असल्याचा इशारा दिला आहे. चीन जाणुनबुजून व पद्धतशीरपणे अमेरिकेच्या सायबरक्षेत्रात कारवाया करीत असल्याचा दावा ‘डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स’ कोट्स यांनी दिला. दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’च्या प्रमुख जिना हॅस्पेल यांनी, चीन ‘आशिया-पॅसिफिक’ व इतर क्षेत्रांमधील त्यांची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अमेरिकेचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप केला होता.

English   हिंदी

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info