सिरियातील इराणच्या सैन्यमाघारीसाठी रशियाने इस्रायलला ‘ऑफर’ दिली – अमेरिकी वृत्तसंकेतस्थळाचा दावा

सिरियातील इराणच्या सैन्यमाघारीसाठी रशियाने इस्रायलला ‘ऑफर’ दिली – अमेरिकी वृत्तसंकेतस्थळाचा दावा

वॉशिंग्टन – इराणबरोबरच्या सहकार्याला फार मोठे महत्त्व देणार्‍या रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी इस्रायलच्या पंतप्रधानांना एक प्रस्ताव दिला होता. इस्रायलच्या मागणीप्रमाणे सिरियातील इराणच्या सैनिकांना माघारी घेतले जाईल. पण त्याआधी इराणवर लादलेले निर्बंध शिथिल करावे यासाठी इस्रायलने अमेरिकेकडे मागणी करावी, अशी ऑफर रशियन पंतप्रधानांनी दिली होती. रशियाच्या या ऑफरवर इस्रायली नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचे सांगून अमेरिकेतील वृत्तसंकेतस्थळाने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

प्रस्ताव, सैन्यमाघारी, व्लादिमिर पुतिन, offer, प्रतिक्रिया, ww3, वॉशिंग्टन, इराणपहिल्या महायुद्धाच्या समाप्तीला शंभर वर्षे पूर्ण झाली म्हणून ११ नोव्हेंबर रोजी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अमेरिका, रशिया, ब्रिटन, जर्मनी, इस्रायलसह अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख तसेच प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. याच कार्यक्रमात रशियन राष्ट्राध्यक्षांनी इस्रायलच्या पंतप्रधानांची भेट घेऊन ही ऑफर दिल्याचा दावा केला जातो.

अमेरिकी संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या या माहितीबाबत रशिया तसेच इस्रायलने प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. पण पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी चार दिवसांपूर्वी इस्रायली सिनेटच्या परराष्ट्र आणि सुरक्षा समितीबरोबर बंद दाराआड झालेल्या बैठकीत रशियाच्या या प्रस्तावाची माहिती दिली, असे अमेरिकी संकेतस्थळाने म्हटले आहे. रशियाच्या या प्रस्तावावर आपण कुठलीही प्रतिक्रिया दिली नसल्याचेही पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी या बैठकीत स्पष्ट केले.

सिरियातील इराणचा प्रभाव मर्यादित करण्याबाबत रशिया आणि अमेरिकेत चर्चा सुरू असून यामध्ये रशियाने दिलेल्या ऑफरचाही समावेश असल्याचे नेत्यान्याहू यांनी इस्रायली संसदेच्या समितीसमोर सांगितले होते. या समितीत सहभागी असलेल्या नेत्यांनी याबाबतची माहिती उघड केल्याचा दावा अमेरिकी संकेतस्थळाने केला. इस्रायलमधील एका वृत्तवाहिनीनेही असाच दावा केला आहे. पण याबाबत रशिया, इस्रायलने कुठलीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे.

सिरियातील इराणी लष्कराच्या वाढत्या हालचाली आपल्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचा आरोप इस्रायलने केला होता. इस्रायलच्या ताब्यातील गोलान टेकड्यांच्या सीमेजवळ इराणचे सैनिक दाखल झाले असून रशियाने इराण व संलग्न लष्कराला माघारी घ्यावे, अशी मागणी इस्रायलने केली होती. सिरियातील इराणच्या सैनिकांना माघारी पाठविले नाही तर सिरियातील यापुढील हल्ल्यांना इस्रायल जबाबदार नसेल, असा इशारा पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी दिला होता. अमेरिकेने देखील सिरियातील इराणच्या लष्कराच्या माघारीची मागणी केली होती.

रशियाने याआधी इस्रायलला सिरियातील इराणच्या लष्कराच्या माघारीचे आश्‍वासन दिले होते. पण त्यानंतर रशियाने सिरियातील इराणच्या सैन्यतैनातीचे समर्थन करून इस्रायलची मागणी धुडकावली होती. त्याचबरोबर अमेरिकेने इराणवर टाकलेल्या निर्बंधांवरही टीका करून रशियाने इराणबरोबरच्या अणुकराराचे समर्थन केले होते.

English

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info