‘हुवेई’ या चिनी कंपनीवरील कारवाईद्वारे जगावर वर्चस्व गाजविण्याचा चीनचा कट उधळला

‘हुवेई’ या चिनी कंपनीवरील कारवाईद्वारे जगावर वर्चस्व गाजविण्याचा चीनचा कट उधळला

शिंग्टन/बीजिंग – चीनसह जगातील आघाडीची दूरसंचार कंपनी ‘हुवेई’च्या कार्यकारी संचालिका वँगझाऊ मेंग यांच्या अटकेमागे चीनच्या जागतिक वर्चस्वाचा प्रयत्न उधळण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न हा मुख्य घटक असल्याचा दावा अमेरिकी अभ्यासकांनी केला आहे. ‘हुवेई’ ही कंपनी चीनच्या सत्ताधारी राजवटीसाठी गुप्तचर यंत्रणा म्हणून काम करते व जागतिक वर्चस्वासाठी चीनच्या राजवटीने आखलेल्या योजनेचा प्रमुख भाग आहे, असा दावा स्टिव्हन मोशर यांनी केला.

दूरसंचार क्षेत्रात कार्यरत असणारी ‘हुवेई’ ही जागतिक स्तरावर दुसर्‍या क्रमांकाची कंपनी म्हणून ओळखण्यात येते. ही कंपनी चीनच्या आर्थिक व औद्योगिक प्रभावक्षेत्राचा महत्त्वाचा घटक म्हणून ओळखण्यात येते. हुवेई’चे संस्थापक ‘रेन झेंगफेई’ चीनच्या लष्करातील माजी अधिकारी असून सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे वरिष्ठ सदस्य आहेत. या महिन्याच्या सुरुवातीलाच ‘हुवेई’च्या कार्यकारी संचालिका व मुख्य वित्तीय अधिकारी वँगझाऊ मेंग यांना कॅनडाने ताब्यात घेण्यात आले होते.

मेंग ‘हुवेई’चे संस्थापक ‘रेन झेंगफेई’ यांच्या कन्या असून सदर कारवाई अमेरिकेच्या इशार्‍यावरून झाल्याचे मानले जाते. कॅनडाने मेंग यांची सुटका करावी, अन्यथा परिणामांसाठी तयार रहावे, असा इशारा चीनकडून देण्यात आला होता. इशारा दिल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यात चीनच्या यंत्रणांनी कॅनडाच्या तीन नागरिकांना वेगवेगळ्या कारणांवरून ताब्यात घेऊन तुरुंगात धाडले आहे. त्यांच्या सुटकेसाठी कॅनडा व अमेरिकेने दबाव टाकल्यानंतरही चीनने त्यांना जुमानले नसून मेंग यांचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे.

 चीनने मेंग यांना दिलेले हे महत्त्व चर्चेचा विषय ठरला असून त्यामागे ‘हुवेई’ या कंपनीचे चीनमधील स्थान आणि सत्ताधारी राजवट व लष्कराशी असलेले संबंध हा मुद्दा महत्त्वाचा ठरला आहे. जगातील अनेक देशांमध्ये हुवेई कंपनीला ‘5जी’ तंत्रज्ञान उभारण्याचे कंत्राट मिळाले आहे. ‘5जी’ हे भविष्यवेधी तंत्रज्ञान असून प्रत्येक क्षेत्रात त्याची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चीन जागतिक स्तरावर वर्चस्व ठेवेल, याकडे मोशर यांनी लक्ष वेधले. ‘हुवेई’ सह इतर चिनी कंपन्याही सत्ताधारी राजवटीसाठी गुप्तचर म्हणून काम करीत असल्याचा दावही मोशर यांनी केला आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info