इराणच्या वाढत्या धोक्याबाबत अरब देश इस्रायलच्या भूमिकेशी सहमत-इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू

इराणच्या वाढत्या धोक्याबाबत अरब देश इस्रायलच्या भूमिकेशी सहमत-इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू

वॉर्सा – ‘इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात शांतीचर्चा संपन्न व्हावी, ही अरब देशांची प्राथमिक मागणी होती. पण आता पॅलेस्टाईनच्या मुद्यापेक्षाही इराणचा धोका या अरब देशांना सर्वात महत्त्वाचा वाटत आहे’, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी केली. वॉर्सा येथील बैठकीत सहभागी झालेल्या चार अरब देशांनी इस्रायलच्या इराणविषयक भूमिकेचे समर्थन केल्याचेही नेत्यान्याहू यांनी सांगितले.

पोलंड येथे अमेरिकेने आयोजित केलेली ‘पीस अँड सिक्युरिटी इन दी मिडल ईस्ट’ या बैठक संपन्न झाली. आंतरराष्ट्रीय माध्यमांना या बैठकीपासून लांब ठेवण्यात आले होते. त्यामुळे या बैठकीतील माहिती उघड होऊ शकली नाही. गुरुवारी उशीरा इस्रायलच्या पंतप्रधानांनी पत्रकारांशी बोलताना या बैठकीबाबत महत्त्वाची घोषणा केली.

‘गेली कित्येक वर्षे मी इराणबाबत जी भूमिका मांडली होती, तीच भूमिका अरब देश स्वीकारीत आहेत. या बैठकीत सहभागी झालेल्या पाच पैकी चार अरब परराष्ट्रमंत्र्यांनी इराणच्या धोक्याबाबबत इस्रायलच्या भूमिकेशी सहमती व्यक्त केली’, असे नेत्यान्याहू यांनी सांगितले.

इस्रायलच्या पंतप्रधानांनी अरब देशांची नावे घेण्याचे टाळले. पण हे अरब देश जॉर्डन-इजिप्तप्रमाणे इस्रायलबरोबर संबंध सुधारण्यासाठी उत्सुक असल्याचा दावा नेत्यान्याहू यांनी केला. तसेच इराणच्या धोक्यापासून स्वसंरक्षण करण्याचा इस्रायलला अधिकार असल्याचेही या अरब देशांनी ६० देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मान्य केल्याचेही नेत्यान्याहू म्हणाले.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून अरब देश इस्रायल तसेच आखाती देशांना धमकावित असलेल्या इराणवर टीका करून इस्रायलच्या भूमिकेचे समर्थन केले होते. तसेच इस्रायलशी सहकार्य प्रस्थापित करण्याचे संकेतही दिले होते. पण इस्रायलबरोबरच्या सहकार्याची उघड भूमिका स्वीकारली नव्हती. अशा परिस्थितीत, या बैठकीतील अरब देशांची इस्रायल समर्थक भूमिका इराणविरोधातील मोठ्या आघाडीची घोषणा करणारी ठरू शकते.

इराणच्या विषारी अर्थसहाय्यामुळे इस्रायल-पॅलेस्टाईन चर्चा रखडली – बाहरिनचे परराष्ट्रमंत्री

Arab nations, back Israel, Benjamin Netanyahu, Poland summit, peace talks, cooperation with Israel, ww3, Warsaw, Saudi Arabia

वॉर्सा – इराणकडून आखातातील दहशतवादाला मिळणार्‍या अर्थसहाय्यामुळे इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील शांतीचर्चा रखडल्याचा आरोप बाहरिनी परराष्ट्रमंत्री ‘खालिद बिन अहमद अल-खलिफा’ यांनी केला. तसेच बाहरिन इस्रायलबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित करू शकतो, असे बाहरिनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पोलंडमधील या बैठकीत अरब देशांनी इस्रायलबाबत मांडलेल्या भूमिकेचा व्हिडिओ इस्रायली पंतप्रधानांच्या कार्यालयाने ‘लिक’ केला आहे. यामध्ये सौदी अरेबियासह आखातातील अन्य दोन देशांचे परराष्ट्रमंत्री इराणच्या दहशतवादसमर्थक धोरणावर टीका करून इस्रायलच्या भूमिकेचे समर्थन करीत असल्याचे दाखविण्यात आले आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info