इस्रायलकडून भारताला ‘बिनशर्त’ व ‘अमर्याद’ सहकार्य

इस्रायलकडून भारताला ‘बिनशर्त’ व ‘अमर्याद’ सहकार्य

नवी दिल्ली – पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी भारताला आत्मरक्षणासाठी कारवाईचा अधिकार असल्याचे मान्य केले होते. त्यांच्या पाठिंब्यामुळे पाकिस्तानात खळबळ माजली आहे. यानंतर इस्रायलचे भारतातील नवनियुक्त राजदूत डॉ. रॉन माल्का यांनी भारताला आपल्या देशाचे बिनशर्त सहकार्य मिळेल, अशी घोषणा केली. तसेच या सहकार्याला कुठलीही मर्यादा नसेल, असे अत्यंत महत्त्वाचे विधान डॉ. माल्का यांनी केले. इस्रायलच्या लष्करी क्षमतेची जाणीव असलेल्या पाकिस्तानची यामुळे घाबरगुंडी उडाली असून पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आपल्या देशाला इस्रायलबरोबरील संबंध सुधारायाचे असल्याचे जाहीर केले.

‘भारत हा इस्रायलचा घनिष्ठ सहकारी व मित्रदेश आहे. आम्ही भारताला बिनशर्त सहकार्य करण्यास तयार आहोत. विशेषतः दहशतवादाच्या विरोधातील भारताची सुरक्षा भक्कम करण्यासाठी इस्रायलकडून भारताला दिल्या जाणार्‍या सहकार्याला कुठल्याही स्वरुपाची मर्यादा असू शकत नाही. दहशतवाद ही केवळ भारत किंवा इस्रायलपुरती मर्यादित राहिलेली समस्या नाही.

तर तो जगासमोर खडा ठाकलेला प्रश्‍न बनला आहे व जगाने सहकार्याने दहशतवादाच्या आव्हानाचा सामना करायला हवा’, अशी अपेक्षा डॉ. माल्का यांनी व्यक्त केली.

‘म्हणूनच इस्रायल भारताला आपला दहशतवादविरोधी कारवायांचा अनुभव, कौशल्य आणि तंत्रज्ञान पुरविण्यासाठी उत्सुक आहे. कारण आम्हाला आमच्या सर्वात निकटतम मित्रदेशाला सुरक्षेसाठी सहाय्य करायचे आहे’, असे सांगून इस्रायली राजदूतांनी आपल्या देशाच्या भावना व्यक्त केल्या. भारतात दाखल होण्यापूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी आपल्याला हाच संदेश दिला होता व भारत हा इस्रायलचा अत्यंत महत्त्वाचा मित्रदेश आहे, असे बजावले होते, असे डॉ. माल्का म्हणाले.

दरम्यान, इस्रायलकडून भारताला बिनशर्त व कुठल्याही मर्यादा नसलेले सहकार्य करण्याचा प्रस्ताव मिळत असताना, पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे. पाकिस्तानला इस्रायलबरोबर संबंध प्रस्थापित करायेच असल्याचा दावा पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी केला. आजवर पाकिस्तानने इस्रायलचे अस्तित्त्व नाकारले असून इस्रायल हा अरब देशांच्या भूमीवर वसलेला अनाधिकृत देश असल्याची पाकिस्तानची भूमिका आहे. मात्र इस्रायल भारताला सहकार्य करीत असल्याचे पाहून पाकिस्तान आपल्या जन्मापासून स्वीकारलेली ही इस्रायलविरोधी भूमिका सोडण्यास तयार झाल्याचे दिसते आहे.

 

भारताने संयम दाखवावा चीनची अपेक्षा

बीजिंग – ‘पुलवामा’च्या भ्याड हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानला धडा शिकविण्याची तयारी करीत असताना, पाकिस्तानचा जीवलग मित्र असलेल्या चीनने भारताला संयम दाखविण्याचे आवाहन केले आहे. भारत व पाकिस्तानने संयम दाखवावा व लवकरात लवकर चर्चेद्वारे प्रश्‍न सोडवावा अशी ‘समंजस’ भूमिका चीनने घेतली आहे.

‘पुलवामा’ येथील हल्ल्यानंतर पाकिस्तानवर खवळलेल्या भारतीय जनतेच्या असंतोषाचा फटका चीनलाही बसणार असल्याचे उघड होत असून चीननेच सुरक्षा परिषदेत नकाराधिकार वापरून ‘जैश’वरील कारवाई रोखली होती, याची भारतीय विश्‍लेषकांसह जनतेलाही आठवण असल्याचे गेल्या पाच दिवसात वारंवार समोर आले होते.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी माध्यमांशी बोलताना पुलवामा हल्ल्याबाबतची चीनची प्रतिक्रिया नोंदविली.

दक्षिण आशियाचे स्थैर्य व सुरक्षा यासाठी भारत व पाकिस्तान हे अत्यंत महत्त्वाचे देश ठरतात, असे सांगून शुआंग यांनी पाकिस्तानची भारताशी बरोबरी करण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत व पाकिस्तानने संयमाचे प्रदर्शन करावे व चर्चेने या समस्येतून मार्ग काढावा अशी चीनची अपेक्षा असल्याचे शुआंग यांनी म्हटले आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info