TWW

Breaking News

अमेरिका-तालिबान चर्चा रद्द – राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या निर्णयाचे अफगाणिस्तानकडून स्वागत

वॉशिंग्टन – तालिबानचे प्रतिनिधी चर्चेसाठी अमेरिकेत येणार होते. याच्या आधी तालिबानने अफगाणिस्तानात १२ जणांची हत्या घडविली व यात एका अमेरिकी सैनिकाचा समावेश आहे. यानंतर मी तालिबानबरोबरील चर्चा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे’, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले. त्यांच्या या घोषणेचे अफगाणिस्तानने जोरदार स्वागत केले. आपल्या सामर्थ्याच्या भ्रमात राहून तालिबानने फार मोठी चूक केली, असे संकेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दिले असून पुढच्या काळात अफगाणिस्तान याचे पडसाद उमटतील, असे स्पष्टपणे दिसू लागले आहे.

अफगाणिस्तान, घोषणेचे स्वागत, अश्रफ गनी, अश्रफ गनी, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, चर्चा, अमेरिका, तालिबानगेल्या काही दिवसांपासून तालिबानने अफगाणिस्तानात चढविलेल्या हल्ल्यांवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला. तालिबानला आणखी किती वर्षे संघर्ष करायचा आहे? असा सवाल करून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी यापुढे तालिबानच्या कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे संकेत दिले. यामुळे अमेरिकेच्या ‘कॅम्प डेव्हिड’ येथे होणारी बैठक रद्द झाली. या चर्चेला अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी व तालिबानचे प्रतिनिधी उपस्थित राहणार होते. पण अफगाणी जनता आणि अमेरिकी सैनिकांचा बळी घेणार्‍या तालिबानशी चर्चा शक्य नसल्याचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी बजावले.

‘अफगाणिस्तानात हल्ले चढवून आपण चर्चेत वर्चस्व गाजवू असा तालिबानचा भ्रम होता. पण असे करून तालिबानने आपली वाट लावून घेतली आहे’, असा सज्जड इशारा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिला. अफगाणिस्तानने अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या या घोषणेचे स्वागत केले. ‘अफगाणिस्तानातील शांती व स्थैर्यासाठी अमेरिकेने योग्य पाऊल उचलले आहे. ही शांती यापुढेही टिकून रहावी, यासाठी अफगाण सरकार अमेरिकेला सहाय्य करील’, अशी ग्वाही राष्ट्राध्यक्ष गनी यांनी दिली.

अमेरिकेचे माजी लष्करी अधिकारी व सामरिक विश्‍लेषकांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या या निर्णयाचे समर्थन केले. तालिबान विश्‍वासघातकी आणि निर्दयी आहेत. त्यामुळे अमेरिकेने त्यांच्याशी मैत्री करणे घातकच ठरले असते, असा दावा या विश्‍लेषकांनी केला आहे. अमेरिकेने तालिबानशी चर्चा सुरू केल्यानंतर, आपण अफगाणिस्तानचे युद्ध जिंकले, असाच सूर तालिबानने लावला होता. त्यामुळे पुढची चर्चा आपल्या शर्तींवर व्हावी, यासाठी तालिबान अफगाणिस्तानात हल्ले चढवून सामर्थ्याचे प्रदर्शन करीत होते. तालिबानचे पाकिस्तानातील समर्थक देखील अमेरिकेचा पराभव झाल्याचे दावे करून आता अमेरिका सुपरपॉवर राहिलेली नाही, असे दावे ठोकत होते. तसेच तालिबानच्या अफगाणिस्तानातील विजयामुळे पाकिस्तानसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याचा समज पाकिस्तानातील तालिबानसमर्थकांनी करून घेतला होता.

English  हिंदी

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info