Breaking News

सिरियन कुर्दांवरील तुर्कीचे हल्ले रोखण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प लष्करी कारवाई करू शकतील – अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ

वॉशिंग्टन – ‘अमेरिकेला सिरियामध्ये युद्ध नको तर शांती हवी आहे. पण जर सिरियन कुर्दांवर सुरू असलेले हल्ले थांबणार नसतील, तर हे हल्ले रोखण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प लष्करी कारवाईचा निर्णय घेऊ शकतील. अमेरिका त्यासाठी सज्ज आहे’, असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी दिला. तुर्कीने कुर्दांसाठी लागू केलेल्या पाच दिवसांच्या संघर्षबंदीची मुदत येत्या काही तासात संपुष्टात येत आहे. तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी कुर्दांवरील हल्ले थांबणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांचा हा इशारा आला आहे.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री, लष्करी कारवाई, माईक पॉम्पिओ, कुर्द, हल्ले, तुर्की, सिरिया, आयएससिरियातून सैन्य माघारी घेण्याच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयावर अमेरिकेतून जोरदार टीका होत आहे. ही माघार घेऊन अमेरिकेला ‘आयएस’विरोधी संघर्षात सहाय्य करणार्‍या सिरियातील कुर्दांची जबाबदारी झटकत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. अमेरिकेतील वृत्तवाहिनीशी बोलताना परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या निर्णयाचे समर्थन केले तसेच विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतला.

सिरियात हल्ले चढविणार्‍या तुर्कीने मर्यादा (रेड लाईन) ओलांडली तर अमेरिका लष्करी कारवाई करील, असे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी स्पष्ट केले. पण ही ‘रेड लाईन’ कोणती, यावर बोलण्याचे अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी टाळले. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हा निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत, असे सांगून सिरियन कुर्दांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नसल्याचे संकेत परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी दिले.

त्याचबरोबर गेल्या आठवड्यात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी तुर्कीवर आर्थिक निर्बंधांबाबत केलेल्या घोषणेची परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी आठवण करून दिली. ‘अमेरिकेने तुर्कीविरोधात आर्थिक निर्बंधांचा वापर केला असून राजनैतिक दबावाचाही वापर केला जाईल’, असे पॉम्पिओ म्हणाले.

दरम्यान, गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष पेन्स व परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर एर्दोगन यांनी पाच दिवसांच्या संघर्षबंदीची घोषणा केली होती. या संघर्षबंदीच्या काळातही तुर्कीने कुर्दांच्या भागात हल्ले चढविले होते. तुर्कीच्या या हल्ल्यांवर जगभरातून टीका झाल्यानंतरही कुर्दांवरील हल्ले सुरू राहणार असल्याचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी जाहीर केले होते.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info