Breaking News

‘कोरोनाव्हायरस’च्या साथीनंतर चीनला ‘बर्ड फ्ल्यू’चा फटका – हुनान प्रांतात सुमारे १८ हजार कोंबड्यांची कत्तल

बीजिंग – ‘कोरोनाव्हायरस’ प्रकारातील अज्ञात विषाणूच्या साथीला रोखण्यात अपयशी ठरलेल्या चीनला आता ‘बर्ड फ्ल्यू’चा फटका बसला आहे. चीनच्या प्रांतातील एका ‘पोल्ट्री फार्म’वर ‘बर्ड फ्ल्यू’च्या साथीमुळे तब्बल साडेचार हजार कोंबड्यांचा बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर चीन सरकारने या प्रांतातील इतर फार्मवरील कोंबड्यांची कत्तल सुरू केली असून सुमारे १८ हजार कोंबड्यांना ठार करण्यात आल्याचा दावा सूत्रांनी केला.

‘बर्ड फ्ल्यू’, कत्तल, एच५एन१, कोरोनाव्हायरस, विषाणू, कोंबड्या, फैलाव, चीन, हाँगकाँग

चीनच्या आग्नेय भागातील हुनान प्रांतात ‘बर्ड फ्ल्यू’ची साथ आली आहे. गेल्या आठवड्यात या प्रांतातील ‘शाओयांग’ शहरातील एका फार्मवर ‘बर्ड फ्ल्यू’मुळे साडेचार हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला. ‘बर्ड फ्ल्यू’ची साथ आलेल्या या फार्मवर सुमारे आठ हजार कोंबड्या होत्या, अशी माहिती चीनच्या सरकारी विभागाने दिली. या घटनेनंतर चीनच्या यंत्रणांनी साथीचा फैलाव रोखण्यासाठी फार्मवरील इतर कोंबड्यांसह नजिकच्या भागातील जवळपास १८ हजार कोंबड्यांची कत्तल केली आहे.

चीनमध्ये सध्या सुरू असलेल्या ‘कोरोनाव्हायरस’ साथीचे मूळ असणार्‍या ‘वुहान’पासून ‘शाओयांग’ शहर सुमारे ३०० मैलांवर आहे. हुनान प्रांतातही कोरोनाव्हायरसच्या साथीचे अनेक रुग्ण आढळले असल्याने ‘बर्ड फ्ल्यू’ची नवी साथ स्थानिक प्रशासनासमोरील अडचणींमध्ये भर टाकणारी ठरली आहे. ‘एच५एन१’ प्रकारातील ‘बर्ड फ्ल्यू’ची साथ प्रामुख्याने प्राण्यांमध्येच आढळणारी असली तरी गेल्या दोन दशकात माणसांमध्येही त्याचा संसर्ग झाल्याच्या घटना आढळल्या होत्या.

१९९७ साली हाँगकाँगमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’च्या मानवी संसर्गाचे पहिले प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर गेल्या दोन दशकात १०पेक्षा अधिक वेळा ‘बर्ड फ्ल्यू’ची साथ आली असून जवळपास ८०० जणांना त्याची लागण झाल्याचे आढळले होते. त्यातील ३६५ जणांचा मृत्यू झाला असून बहुतांश प्रकरणे चीन व नजिकच्या देशांमधील आहेत.

२०१३ साली चीनमध्ये आलेली ‘बर्ड फ्ल्यू’ची साथ सर्वात मोठी साथ म्हणून ओळखण्यात येते. जगभरातील सुमारे ६० देशामध्ये या साथीचा फैलाव झाला होता. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार या साथीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला तब्बल साडेसहा अब्ज डॉलर्सचा फटका बसला होता.

English

इस समाचार के प्रति अपने विचार एवं अभिप्राय व्यक्त करने के लिए नीचे क्लिक करें:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info