अमेरिकेने रशियावर लादलेल्या निर्बंधांविरोधात रशिया सिरियात अण्वस्त्रे तैनात करील – रशियन संसद सदस्याचा दावा

अमेरिकेने रशियावर लादलेल्या निर्बंधांविरोधात रशिया सिरियात अण्वस्त्रे तैनात करील – रशियन संसद सदस्याचा दावा

मॉस्को – सिरियात अण्वस्त्रे तैनात करून रशिया अमेरिकेच्या निर्बंधांना उत्तर देऊ शकेल, असा दावा करून रशियन संसदसदस्यांनी खळबळ माजविली आहे. अमेरिकेने रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादले असून याचा ताण रशियन अर्थव्यवस्थेवर आला असून रशियन रुबलची किंमत घसरली आहे. मात्र याला उत्तर देण्यासाठी सिरियात अण्वस्त्रे तैनात करण्याचा संसदसदस्य व्लादिमिर गुतेनेव्ह यांनी दिलेल्या या इशार्‍यावर अमेरिकेकडून तितकीच स्फोटक प्रतिक्रिया अपेक्षित आहे. त्यामुळे सिरियातील परिस्थिती भयावहरित्या चिघळण्याच्या बेतात असल्याचे संकेत मिळत आहेत.

अण्वस्त्रे, तैनात, व्लादिमिर गुतेनेव्ह, निर्बंध, प्रत्युत्तर, सर्जेई स्क्रिपलगेल्या आठवड्यात अमेरिकेने रशियावर निर्बंध लादले होते. ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये सोव्हिएत रशियाचा माजी हेर सर्जेई स्क्रिपल याच्यावर विषप्रयोग करून रशियाने रासायनिक व जैविक शस्त्रास्त्रसंबंधीच्या आंतरराष्ट्रीय कराराचे उल्लंघन करून अमेरिकेने हे निर्बंध जाहीर केले. यावर रशियन संसदेतील कनिष्ठ सभागृहातील ‘इकोनॉमिक पॉलिसी कमिटी’चे उपप्रमुख गुतेनेव्ह यांनी जोरदार टीका केली असून या निर्बंधांद्वारे अमेरिकेने मर्यादारेषा (रेड लाईन्स) ओलांडल्याचा आरोप केला.

रशियावर निर्बंध टाकून अमेरिकेने आपल्या मर्यादारेषा ओलांडल्यानंतर रशियान देखील आपल्या मर्यादारेषा निश्‍चित कराव्या लागतील, असे गुतेनेव्ह यांनी सुचविले. ‘रशियाने अमेरिकेला सडेतोड प्रत्युत्तर देण्याची हीच वेळ असून रशियाने सिरियामध्ये अण्वस्त्रे तैनात करावी. सिरियातील रशियन अण्वस्त्रांची तैनाती अमेरिकेच्या निर्बंधांना जशास तसेच प्रत्युत्तर ठरेल’, असा दावा गुतेनेव्ह यांनी केला.

याआधी रशियातील विश्‍लेषकांनी देखील सिरियामध्ये अण्वस्त्रे तैनात करण्याबाबत राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना सल्ला दिला होता, याची आठवण गुतेनेव्ह यांनी रशियन संसदेत करून दिली.

दरम्यान, सिरियामध्ये रासायनिक हल्ल्याचा बनाव रचून अमेरिका सिरियातील अस्साद राजवटीवर हल्ल्याची योजना आखत असल्याचा आरोप रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनाशेंकोव्ह यांनी केला आहे. गेल्या आठवड्यात ‘टॉमाहॉक’ क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेले अमेरिकेची विनाशिका भूमध्य समुद्रात दाखल झाली आहे. या व्यतिरिक्त पर्शियन आखातातही अमेरिकी विनाशिकेची अतिरिक्त तैनाती आणि बॉम्बर विमानाच्या घिरट्यांचा उल्लेख करून रशियन संरक्षण मंत्रालयाने हा दावा केला.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info