कतारमध्ये अमेरिका व तालिबानची चर्चा

कतारमध्ये अमेरिका व तालिबानची चर्चा

वॉशिंग्टन – अफगाणिस्तानातील शांतीप्रक्रियेसाठी अमेरिकेने नियुक्त केलेले विशेष दूत झल्मे खलिलझाद यांची तालिबानबरोबर चर्चा पार पडली. कतारमध्ये झालेल्या या चर्चेनंतर खलिलझाद अफगाणिस्तानात आल्याच्याही बातम्या प्रसिद्ध झाल्या. गेल्या चार महिन्यात अमेरिकेने तालिबानबरोबर केलेली ही दुसरी चर्चा ठरते. या चर्चेचे तपशील उघड झालेले नाहीत. इतकेच काय पण अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या चर्चेबाबत कुठल्याही प्रकारची माहिती देण्याचे नाकारले.

दूत, चर्चा, अफगाणी सरकार, ९/११ दहशतवादी हल्ला, तालिबान, आक्रमण, world war 3, कतार, पाकिस्तान९/११ दहशतवादी हल्ला झाल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानात दहशतवादविरोधी युद्ध पुकारले होते. या युद्धाला १७ वर्षे उलटून गेली आहेत. तरीही हे युद्ध अमेरिका जिंकू शकलेली नाही. सध्या अफगाणिस्तानात सत्तेवर असलेले सरकार व अफगाणी लष्कर हे युद्ध खेळत असले तरी अमेरिकेने या युद्धात पूर्ण माघार घेतलेली नाही. गेल्या काही महिन्यांपासून तालिबानने अफगाणिस्तानात मुसंडी मारली असून अफगाणी लष्कराची अवस्था बिकट बनली आहे.

तालिबानच्या हल्ल्यांचे सत्र तीव्र होत असतानाच, अमेरिकेने या दहशतवादी संघटनेशी चर्चा करण्याची तयारी दाखविली. अफगाणी सरकारनेही तालिबानला चर्चेचे आवाहन केले होते. अफगाणी सरकारचे आवाहन धुडकावणार्‍या तालिबानने गेल्या चार महिन्यात अमेरिकेशी दोन वेळा चर्चा करण्याची तयारी दाखविली. कतारमध्ये पार पडलेल्या चर्चेत नक्की काय झाले याची माहिती समोर आलेली नाही. पण अमेरिका व तालिबान करीत असलेल्या या चर्चेचे फार मोठे परिणाम समोर येऊ शकतात.

कुठल्याही दहशतवादी संघटनेशी चर्चा करायची नाही, असे अमेरिकेचे राष्ट्रीय धोरण आहे. तर अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेतल्याखेरीज चर्चा शक्य नसल्याची ताठर भूमिका तालिबानने घेतली होती. पण दोन्ही पक्षांनी यापासून माघार घेऊन तडजोडीची तयारी दाखविल्याचे संकेत मिळत आहेत. सोव्हिएत रशियाने अफगाणिस्तानवर आक्रमण केल्यानंतर अमेरिकेनेच पाकिस्तानला हाताशी धरून तालिबानची निर्मिती केली होती. पण अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी युद्धात तालिबानचेच दहशतवादी अमेरिकन सैनिकांवर हल्ले चढवीत होते, हा अमेरिकेच्या धोरणाचा पराभव ठरतो, अशी टीका जगभरातून केली जात होती.

दूत, चर्चा, अफगाणी सरकार, ९/११ दहशतवादी हल्ला, तालिबान, आक्रमण, world war 3, कतार, पाकिस्तानतालिबानबरोबर अमेरिकेची चर्चा यशस्वी ठरली तरी अमेरिका काही अफगाणिस्तानातून माघार घेणे शक्य नाही. उलट अफगाणिस्तान अस्थिर राहिला तर ते अमेरिकेच्या हितसंबंधांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्‍लेषकांचा दावा आहे. असे असले तरी अफगाणिस्तानात निदान काही प्रमाणात स्थैर्य परतले तर अमेरिकेला आपली उद्दिष्टे साध्य करणे सोपे जाऊ शकते. अमेरिका त्यासाठीच तालिबानशी चर्चा करीत असल्याची दाट शक्यता या निमित्ताने समोर येत आहे.

English   हिंदी

Click below to express your thoughts and views on this news:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info