अमेरिकेने इराणवर लादलेल्या निर्बंधांच्या मुद्यावरून चिनी कंपनी ‘हुवेई’च्या कार्यकारी संचालिकेला कॅनडात अटक – चीनकडून तीव्र नाराजी

अमेरिकेने इराणवर लादलेल्या निर्बंधांच्या मुद्यावरून चिनी कंपनी ‘हुवेई’च्या कार्यकारी संचालिकेला कॅनडात अटक – चीनकडून तीव्र नाराजी

व्हँकोव्हर/वॉशिंग्टन/बीजिंग – चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीशी संबंध असलेल्या ‘हुवेई’ या दूरसंचार क्षेत्रातील कंपनीच्या कार्यकारी संचालक वँगझाऊ मेंग यांना कॅनडात अटक करण्यात आली आहे. अमेरिकेच्या इशार्‍यावरून मेंग यांना ताब्यात घेतले असून लवकरच त्यांचे अमेरिकेत प्रत्यार्पण केले जाण्याचे संकेत देण्यात आले आहेत. अमेरिकेने इराणवर लादलेल्या निर्बंधांच्या मुद्यावरून ‘हुवेई’ कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना लक्ष्य केल्याचे सांगण्यात येते. या कारवाईवर चीनकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून अमेरिका-चीनमधील व्यापारी तणाव अधिकच चिघळण्याची भीती आहे.

कार्यकारी संचालक, अटक, वँगझाऊ मेंग, telecommunications company, व्यापारयुद्ध, US, चीन, ब्रिटनगेल्याच आठवड्यात अर्जेंटिनात झालेल्या ‘जी-20’ बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका व चीनमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही देशांनी सध्या भडकलेल्या व्यापारयुद्धात 90 दिवसांची ‘संघर्षबंदी’ करण्यावर एकमत झाल्याची घोषणा केली होती. ही महत्त्वपूर्ण बैठक सुरू असतानाच कॅनडातील व्हँकोव्हर शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘हुवेई’च्या कार्यकारी संचालक व मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) वँगझाऊ मेंग यांना ताब्यात घेण्यात आले. मेंग या ‘हुवेई’ कंपनीचे संस्थापक ‘रेन झेंगफेई’ यांच्या कन्या असून गेली 25 वर्षे कंपनीत कार्यरत आहेत.

अमेरिका व चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापारयुद्धाच्या पार्श्‍वभूमीवर झालेली ही अटक खळबळ उडविणारी ठरली आहे. ‘हुवेई’ चीनमधील दूरसंचार क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असून चीनचे लष्कर व सत्ताधारी राजवटीशी थेट संबंध असणारा उपक्रम म्हणून त्यावर टीका केली जाते. जगातील जवळपास 170 देशांमध्ये सक्रिय असणार्‍या या कंपनीने दूरसंचार क्षेत्रातील ‘5जी’ या नव्या तंत्रज्ञानात आघाडी घेतली आहे. जगातील प्रमुख देशांमध्ये ‘5जी’ साठी सुरू झालेल्या हालचालींमध्ये या कंपनीचा समावेश आहे.

अमेरिकेतील या कंपनीची गुंतवणूक वादाच्या भोवर्‍यात सापडली असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यावर बंदी टाकण्याची धमकी दिली होती. मात्र कंपनीकडून दंड वसूल करून तसेच निर्बंध लादून बंदीची कारवाई मागे घेण्यात आली. त्याचवेळी अमेरिकेच्या कोषागार व व्यापार विभागाने ‘हुवेई’च्या चौकशीची मागणी पुढे केली होती. अमेरिकेने निर्बंध लादलेल्या इराण, क्युबा, सुदान व सिरियासारख्या देशांना ही कंपनी सहकार्य करीत असल्याचा आरोप या मागणीत करण्यात आला होता.

गेल्या आठवड्यात वँगझाऊ मेंग यांना झालेली अटक ही इराण निर्बंधांबाबतची कारवाई म्हणून झाल्याचे सांगण्यात येत आहे. कॅनडाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकी यंत्रणांनी मेंग यांना ताब्यात घेण्यात यावे, अशी सूचना दिली होती. मेंग अद्याप कॅनडात असून लवकरच त्यांचे अमेरिकेत प्रत्यार्पण करण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येते. चीनबरोबर व्यापारी कराराबाबत चर्चा सुरू असतानाच झालेली ही कारवाई ट्रम्प प्रशासनाची चीनविरोधातील आक्रमकता दर्शविणारी असल्याचा दावा विश्‍लेषकांनी केला आहे.

दरम्यान, मेंग यांच्यावर झालेल्या कारवाईच्या मुद्यावर चीनने तीव्र नाराजी दर्शविली असून यात मानवाधिकारांचा भंग झाल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी कॅनडा व अमेरिका या दोन्ही देशांकडून स्पष्टीकरण मागण्यात आल्याची माहिती चीनच्या अधिकार्‍यांनी दिली.

ब्रिटनच्या दूरसंचार कंपनीची ‘हुवेई’वर बंदी

लंडन – ब्रिटनची आघाडीची दूरसंचार कंपनी ‘बीटी ग्रुप’ने ‘5जी’ तंत्रज्ञानासाठी चीनच्या ‘हुवेई’ कंपनीचे सहकार्य घेण्यात येणार नाही, असे जाहीर केले आहे. त्याचवेळी यापूर्वी ‘3जी’ व ‘4जी’ तंत्रज्ञानासाठी वापरण्यात आलेली चिनी कंपनीची उत्पादनेही काढून घेण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी ब्रिटीश गुप्तचर यंत्रणा ‘एमआय6’चे प्रमुख अ‍ॅलेक्स यंगर यांनी, ब्रिटीश कंपन्यांनी चिनी तंत्रज्ञानावर जास्त अवलंबून राहू नये, असे बजावले होते.

चीनच्या ‘हुवेई’ कंपनीचे तंत्रज्ञान नाकारणारा ब्रिटन हा चौथा देश ठरला आहे. यापूर्वी अमेरिका, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या देशांनीही ‘हुवेई’चे तंत्रज्ञान नाकारले होते. या पार्श्‍वभूमीवर ब्रिटनमधील विश्‍लेषकांनी, ब्रिटनला युरोपिय महासंघापेक्षा चीनचा आर्थिक हावरटपणा अधिक घातक असल्याचा इशारा दिला आहे.

 

English   हिंदी

 

इस समाचार के प्रति अपने विचार एवं अभिप्राय व्यक्त करने के लिए नीचे क्लिक करें:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info