अमेरिकी कर्जरोख्यांची विक्री करून चीन अमेरिकेला आर्थिक धक्का देण्याच्या तयारीत

अमेरिकी कर्जरोख्यांची विक्री करून चीन अमेरिकेला आर्थिक धक्का देण्याच्या तयारीत

आर्थिक धक्का, गुंतवणुकीचा वापर, डोनाल्ड ट्रम्प, उत्पादन, व्यापारयुद्ध, ww3, चीन, अमेरिका, रशियावॉशिंग्टन- चीनबरोबरील व्यापारात आत्तापर्यंत सहन करावी लागलेली व्यापारी तूट अमेरिका यापुढे सहन करणार नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. दोन्ही देशांमध्ये पेटलेल्या व्यापारयुद्धाच्या पार्श्‍वभूमीवर उभय देशांमधील चर्चेची फेरी संपत असताना, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलेले हे विधान लक्षणीय ठरते. मात्र या व्यापारयुद्धात अमेरिकेला धक्का देण्यासाठी चीननेही पावले उचलल्याचे दिसत आहे. यासाठी चीनने अमेरिकी कर्जरोख्यांमधील आपल्या प्रचंड गुंतवणुकीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेच्या कर्जरोख्यांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक करणारा देश चीन असून चीनने आता या कर्जरोख्यांच्या विक्रीचा सपाटा लावला आहे. यानुसार मागच्या काही महिन्यांपासून चीनने अमेरिकी कर्जरोखे विक्रीस काढले आहेत. चीनकडे जवळपास १.४ ट्रिलियन डॉलर्सचे अमेरिकी कर्जरोखे होते. हे प्रमाण चीनने १.१२ ट्रिलियन डॉलर्सवर आणले आहे. ही गुंतवणूक मागे घेऊन चीन अमेरिकेला व्यापारयुद्धात आपण आक्रमक पावले उचलू शकतो, याची जाणीव करून देत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनच्या उत्पादनांवरील कर वाढवून व्यापारयुद्ध छेडल्यानंतर, चीनने अमेरिकेच्या कर्जरोख्यांमधील आपल्या गुंतवणुकीचा दाखला देऊन याचा वापर शस्त्रासारखा केला जाईल, असे अमेरिकेला बजावले होते. त्यामुळे चीनने गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकी कर्जरोख्यांमधील गुंतवणूक मागे घेणे, ही सर्वसामान्य बाब ठरत नाही. तर हे चीनने अमेरिकेच्या विरोधात वापरलेले आर्थिक शस्त्रच ठरते, असे संकेत मिळत आहेत. व्यापारयुद्धात अमेरिकेने माघार घेतली नाही व चीनच्या निर्यातीला लक्ष्य करणे सुरू ठेवले, तर पुढच्या काळात चीन अमेरिकेच्या कर्जरोख्यांची विक्री वाढवून अमेरिकी अर्थव्यवस्थेसमोर आव्हान उभे केल्यावाचून राहणार नाही. यामुळे अमेरिका आणि चीनमधील व्यापारी युद्ध अधिकच तीव्र होऊ शकेल.

आर्थिक धक्का, गुंतवणुकीचा वापर, डोनाल्ड ट्रम्प, उत्पादन, व्यापारयुद्ध, ww3, चीन, अमेरिका, रशियाचीनने अमेरिकी कर्जरोख्यांमधील गुंतवणुकीबाबत असे आक्रमक निर्णय घेतले, तर अमेरिकेसाठीही असे निर्णय घेण्याचा मार्ग मोकळा असेल, असा संदेश याआधी अमेरिकेकडून चीनला देण्यात आला होता. किंबहुना चीनबरोबर व्यापारयुद्ध छेडण्याच्या?आधी त्याची तयारी ट्रम्प प्रशासनाने ठेवली होती, असे दावेही केले जात आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीही नुकत्याच केलेल्या विधानातून याचे संकेत मिळत आहेत. आजवर चीनने द्विपक्षीय व्यापारात अमेरिकेकडून वार्षिक ५०० अब्ज डॉलर्सचा लाभ उकळला. पण यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही, असे सांगून ट्रम्प यांनी चीनबाबतचे धोरण बदलणार नसल्याचे ठसून सांगितले.

व्यापारयुद्ध टाळण्यासाठी अमेरिका व चीनमध्ये चर्चा सुरू असून या चर्चेवर ट्रम्प यांनी समाधान व्यक्त केले. पण अजूनही या चर्चेत आपल्याला अपेक्षित असलेली प्रगती दिलेली नाही, हे ही ट्रम्प यांनी म्हटले आहे. ही चर्चा यशस्वी ठरली, तर त्यानंतरचे चित्र खूपच वेगळे असेल, असे सांगून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सांगत आहेत. पण सध्या तरी चीन या आघाडीवर अमेरिकेला अपेक्षित असलेले निर्णय घेण्याच्या तयारीत नाही. अमेरिकन कर्जरोख्यांची विक्री करून चीन अमेरिकेच्या व्यापारी दडपणाला प्रत्युत्तर देत आहे. याआधी रशियाने अमेरिकेच्या कर्जरोख्यांमधील गुंतवणूक प्रचंड प्रमाणात कमी करून अमेरिकेला धक्का देण्याचा प्रयत्न केला होता.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info