संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत अफगाणिस्तानची पाकिस्तानविरोधात तक्रार

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत अफगाणिस्तानची पाकिस्तानविरोधात तक्रार

न्यूयॉर्क/काबुल/तेहरान – भारत, इराण या शेजारी देशांमध्ये दहशतवादी हल्ले घडविणार्‍या पाकिस्तानच्या विरोधात अफगाणिस्तानने आक्रमक भूमिका घेतली असून संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत तक्रार नोंदविली आहे. पाकिस्तानी लष्कराकडून आपल्या सीमेवर रॉकेट हल्ले केले जात असून हवाईहद्दीचे देखील उल्लंघन होत असल्याचा आरोप अफगाणिस्तानने केला. चीनचा अपवाद वगळता सर्वच शेजारी देश पाकिस्तानच्या विरोधात खडे ठाकल्याने, पाकिस्तानवरील दडपण अधिकच वाढल्याचे दिसत आहे.

अफगाणिस्तान, तक्रार, संयुक्त राष्ट्रसंघ, पाकिस्तान, दहशतवादी हल्ले, काबुल, इराणपाकिस्तानच्या लष्कराकडून अफगाणिस्तानच्या सीमेचे सातत्याने उल्लंघन सुरू असल्याचे अफगाण सरकारने सुरक्षा परिषदेत केलेल्या आपल्या आरोपांमध्ये म्हटले आहे. २०१२ सालापासून पाकिस्तानी लष्कराकडून अफगाणिस्तानच्या सीमेवर रॉकेटस्, मॉर्टर्सचे हल्ले केले जातात. तसेच या हल्ल्यांबरोबर पाकिस्तानी लष्कराचे हेलिकॉप्टर्स हवाईसीमेचे उल्लंघन करून आपल्या हवाईहद्दीत घुसखोरी करीत असल्याचे अफगाण सरकारने म्हटले आहे.

पाकिस्तानी लष्कर सातत्याने अफगाणिस्तानच्या हवाईहद्दीचे उल्लंघन करून आपल्या सार्वभौमत्वाला आव्हान देत असल्याचा संताप अफगाण सरकारने सुरक्षा परिषदेला लिहिलेल्या पत्रात व्यक्त केला आहे. पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या कुनार आणि नानगरहार प्रांतात पाकिस्तानी हेलिकॉप्टर्सची ही घुसखोरी सुरू असल्याची माहिती सुरक्षा परिषदेतील अफगाणिस्तानचे राजदूत ‘नझिफुल्ला सलारझाई’ यांनी दिली.

त्याचबरोबर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुचनेनंतरही पाकिस्तानी लष्कराकडून अफगाणिस्तानच्या सीमेत सुरक्षा चौक्यांची उभारणी आणि तारेच्या कुंपणाची उभारणी सुरू असल्याचे अफगाण सरकारने आपल्या आरोपांमध्ये म्हटले आहे. पाकिस्तानच्या या घुसखोरीची सुरक्षा परिषदेने दखल घ्यावी आणि पाकिस्तानला कडक शब्दात समज द्यावी, असे आवाहन अफगाण सरकारने केले आहे. गेल्या आठवड्याभरात अफगणिस्तानने पाकिस्तानविरोधात सुरक्षा परिषदेला पाठविलेले हे दुसरे पत्र आहे.

अफगाणिस्तान, तक्रार, संयुक्त राष्ट्रसंघ, पाकिस्तान, दहशतवादी हल्ले, काबुल, इराणगेल्या आठवड्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या विरोधात एक पत्र लिहिले होते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तालिबानबरोबर आयोजित केलेल्या बैठकीच्या विरोधात अफगाण सरकारने टीका केली होती. पाकिस्तानात होणारी ही बैठक अफगाण शांतीचर्चा आणि सार्वभौमत्वाला आव्हान देणारी असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर तालिबानने पाकिस्तानमधील चर्चेतून माघार घेतली होती.

२०१२ ते २०१८ या सहा वर्षांच्या कालावधीत अफगाणिस्तानने पाकिस्तानविरोधात २८१ तक्रारी केल्या आहेत. पण गेल्या काही आठवड्यांपासून अफगाणिस्तानने सुरक्षा परिषदेत पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. अफगाणिस्तानप्रमाणे पाकिस्तानचा इराणच्या सीमेवरही संघर्ष सुरू आहे. पाकिस्तान सरकार सीमाभागात दडलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई करीत नाही, असा आरोप इराण करीत आहे. हे दहशतवादी इराणच्या हद्दीत घुसून हल्ले चढवित असल्याची टीका इराणने केली होती. पाकिस्तानच्या सरकारने वेळीच या दहशतवाद्यांवर कारवाई केली नाही तर पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ले चढविण्याची धमकी इराणने दिली होती.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info