पाकिस्तानचा थरकाप

पाकिस्तानचा थरकाप

इस्लामाबाद – इस्रायलला हाताशी धरून भारत पाकिस्तानच्या कराची, बहावलपूरसह इतर ठिकाणांवर हल्ले चढविल, या भीतीने पाकिस्तानची गाळण उडाली आहे. पाकिस्तानच्या काही वृत्तवाहिन्यांनी सूत्रांचा हवाला देऊन या बातम्या प्रसिद्ध केल्या. पाकिस्तानच्या वायुसेनाप्रमुखांनीही देशासमोरील संकट टळलेले नाही, असे सांगून आपल्या हवाई दलाला सज्जतेचे आदेश दिले आहेत. भारताने हल्ला चढविलाच, तर त्याला प्रत्युत्तर दिले जाईल, अशा धमक्याही पाकिस्तानातून दिल्या जात आहेत. पण प्रत्यक्षात भारताच्या हल्ल्याच्या भीतीनेच पाकिस्तानचा थरकाप उडल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

२७ फेब्रुवारी रोजी भारताच्या हवाई हद्दीत घुसखोरी करून भारताचे ‘मिग-२१’ विमान पाडल्यानंतर पाकिस्तानात जल्लोषाचे वातावरण होते. भारताला धडा शिकविल्याचे दावे या देशाचे माजी लष्करी अधिकारी, सामरिक विश्‍लेषक आणि नेते करू लागले होते. तसेच दोन्ही देशांमध्ये युद्ध पेटले नाही, म्हणून आपली निराशा झाल्याचा दावा पाकिस्तानी जनता करीत होती, असे या देशाच्या रेल्वमंत्र्यांनी आपल्या संसदेत जाहीर केले होते. पण आता पाकिस्तानातील खरी परिस्थिती समोर येऊ लागली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील ‘फोर्ट अब्बास’ भागात भारताच्या लढाऊ विमानांनी हल्ले चढविल्याची बातमी सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली. यानंतर बहावलपूरपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी घबराहट पसरली होती. याबाबत पाकिस्तानच्या यंत्रणांना घाईघाईने भारताच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानात प्रवेश केलेला नाही, असा खुलासा करावा लागला होता.

या घटनेवरून पाकिस्तानी जनता भारताच्या हल्ल्याच्या भीतीने धास्तावल्याचे समोर येत आहे. इतकेच नाही तर भारत इस्रायलच्या साथीने पाकिस्तानच्या कराची, बहावलपूर व इतर ठिकाणी जोरदार हल्ले चढविणार असून राजस्थानातील भारतीय लष्कराच्या तळावरून हे हल्ले चढविले जातील, असा दावा पाकिस्तानच्या काही वृत्तवाहिन्या व वर्तमानपत्रांनी केलाआहे.

यासाठी सदर वृत्तवाहिन्या व वर्तमानपत्रांनी सरकारी सूत्रांचा हवाला दिला. यामुळेही पाकिस्तानची घाबरगुंडी उडल्याचे दिसू लागले असून पाकिस्तानच्या हवाई दलाच्या प्रमुखांनीही देशासमोरचा धोका अद्याप टळलेला नसल्याचे बजावले आहे. पाकिस्तानच्या हवाई दलाने बेसावध राहू नये, असे हवाई दलाचे प्रमुख मुजाहिद अन्वर खान म्हणाले.

भारताबरोबर चर्चा सुरू नसली तरी भारताने पाकिस्तानवर हल्ला चढविल्यास त्याचे प्रत्युत्तर दिले जाईल, हा संदेश भारत सरकारपर्यंत पोहोचविण्यात आल्याचे दावे पाकिस्तानी माध्यमांनी केले आहे. पण भारताच्या हल्ल्याच्याही आधी त्याचे परिणाम पाकिस्तानच्या व्यापारक्षेत्र व अर्थव्यवस्थेवर दिसत आहेत. म्हणूनच वेगवेगळ्या मार्गाने भारताचा हल्ला टाळण्यासाठी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय समुदायाला मध्यस्थीसाठी आवाहन करीत आहे. पाकिस्तानच्या अमेरिकेतील राजदूत मलिहा लोधी यांनी पाकिस्तान आपले सैन्य अफगाणिस्तानातील सीमेवरील काढून घेऊन भारताच्या सीमेवर तैनात करील, असे अमेरिकेला बजावले आहे.

अफगाणिस्तानच्या सीमेवर तैनात असलेल्या आपल्या फौजांमुळेच अफगाणिस्तानात शांतता नांदत आहे. या फौजा मागे घेतल्या, तर अफगाणिस्तानची व अफगाणिस्तानातील अमेरिकन सैनिकांची सुरक्षा धोक्यात येईल, हा तर्क मलिहा लोधी यांच्या इशार्‍यामागे आहे. पण या ठिकाणाहून सैन्य मागे घेतले तर सध्याच्या स्थितीत अफगाणिस्तानपेक्षाही पाकिस्तानच अधिक धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info