अमेरिका ‘पॉकेट हेलिकॉप्टर ड्रोन्स’ अफगाणिस्तानात तैनात करणार

अमेरिका ‘पॉकेट हेलिकॉप्टर ड्रोन्स’ अफगाणिस्तानात तैनात करणार

काबुल – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, अफगाणिस्तानातून अमेरिका लष्करी माघार घेणार असल्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर अफगाणिस्तानात तालिबानच्या हल्ल्यांची तीव्रता अधिकच वाढली असून या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने अफगाणिस्तानातील लष्करी मोहीम पुढील काही काळ कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत. त्याचवेळी या काळात लष्करी मोहिमांमध्ये अधिक प्रगत तंत्रज्ञानाचा वापर होणार असून या महिन्यात तैनात होणारी ‘पॉकेट हेलिकॉप्टर ड्रोन्स’ त्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

अमेरिकी लष्कराने प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत, ‘ब्लॅक हॉर्नेट’ नावाचे ‘पॉकेट ड्रोन्स’ अफगाणिस्तानात तैनात करण्यात येत असल्याची माहिती दिली. लष्कराची ‘८२ एअरबोर्न डिव्हिजन’ हे ड्रोन्स वापरणार असून त्याचा वापर लष्करी कारवाईदरम्यान टेहळणीसाठी करण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे लष्करी तुकडीतील प्रत्येक सैनिकासाठी स्वतंत्र ‘ड्रोन सिस्टिम’ असून तो त्यांच्या ‘मिलिटरी गिअर’चा भाग असेल, असे स्पष्ट करण्यात आले. ‘ब्लॅक हॉर्नेट’चा समावेश असणार्‍या लष्करी पथकाची तैनाती अफगाणिस्तानच्या कंदाहारमध्ये होणार असल्याचे संकेत सूत्रांनी दिले आहेत.  

‘पॉकेट हेलिकॉप्टर ड्रोन्स’, तैनात, ब्लॅक हॉर्नेट, ड्रोन सिस्टिम, लष्करी कारवाई, अमेरिका, अफगाणिस्तान, नॅनो टेक्नॉलॉजी

अवघ्या साडेसहा इंच लांब व सुमारे ३३ ग्रॅम वजनाच्या ‘ब्लॅक हॉर्नेट’मध्ये अनेक कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. रात्रीच्या अंधारात स्पष्ट प्रतिमा दाखविण्याची क्षमता असणार्‍या या ड्रोन्समध्ये ‘थर्मल इमेजिंग’चाही समावेश आहे. ‘सायलेंट मोड’मध्ये काम करण्यार्‍या या ड्रोन्सचा वेग ताशी २५ किलोमीटर असून एकावेळी हे ड्रोन जवळपास २५ मिनिटांचा प्रवास करु शकते. स्वयंचलित तसेच ‘मॅन्युअली’ अशा दोन्ही प्रकारात हाताळण्यात येणार्‍या या ‘ड्रोन सिस्टिम’मध्ये ‘जीपीएस’ची आवश्यकता नाही.

‘हे ड्रोन तंत्रज्ञान सैनिकाचा जीव वाचचिणारे तंत्रज्ञान ठरणार आहे. लढाईदरम्यान सैनिकांवर होणारे हल्ले व त्यातून होणार्‍या जीवघेण्या जखमांपासून हे ड्रोन सैनिकांना लांब ठेवण्यात यशस्वी होईल. त्याचवेळी सैनिकाच्या युद्धातील कारवाईची अचूकताही अधिक वाढेल’, अशा विश्‍वास ‘ब्लॅक हॉर्नेट’ ड्रोन यंत्रणेचे प्रशिक्षण घेतलेल्या सैनिकाने व्यक्त केला. सदर ड्रोन हॅकिंगपासून सुरक्षित असल्याचा दावा याचे प्रशिक्षण देणार्‍या अधिकार्‍यांनी केला आहे.

अमेरिकी लष्कराने तीन वर्षांपूर्वी आपल्या ‘स्पेशल फोर्सेस’च्या प्रशिक्षणासाठी ‘ब्लॅक हॉर्नेट’ या मिनी ड्रोन्स सिस्टिमचा वापर केला होता. त्यानंतर गेली तीन वर्षे सातत्याने याच्या चाचण्या व प्रशिक्षण सुरू असून अफगाणिस्तानात होणारी तैनाती त्याचा युद्धातील पहिला प्रत्यक्ष वापर ठरणार असल्याचे मानले जाते. अमेरिकी लष्कराने प्रत्येकी दोन ड्रोन्सचा समावेश असणार्‍या नऊ हजार यंत्रणांची मागणी केली आहे.

अमेरिकी संरक्षणदलाने गेल्या काही वर्षात सैनिकांसाठी अधिकाधिक प्रगत तंत्रज्ञानाचा वापर असणार्‍या यंत्रणा विकसित करण्यावर भर दिला असून त्याचा वापर करण्याचीही तयारी सुरू झाली आहे. यात ‘ड्रोन’ तंत्रज्ञान आघाडीवर असून त्यात ‘लेझर’ तसेच ‘नॅनो टेक्नॉलॉजी’चा वापर असणार्‍या ड्रोन्सचाही समावेश आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info