वॉशिंग्टन – ‘गुगलचे चीनशी असलेले संबंध अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा ठरु शकतो किंवा नाही. पण जर तसे आढळले तर अमेरिका सरकार त्याची नीट चौकशी करेल. मला आशा आहे की गुगलच्या चीनमधील व्यवहारांमध्ये काही समस्या नसेल’, अशा खरमरीत शब्दात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘गुगल’ला इशारा दिला.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील आघाडीचे गुंतवणूकदार व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ पीटर थिएल यांनी ‘गुगल’ व चीनच्या संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावेळी थिएल यांच्या वक्तव्याचा आधार घेऊन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘गुगल’वर टीकास्त्र सोडले होते. यावेळी अमेरिकी प्रशासन, ‘गुगल’ व चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीदरम्यान असणार्या संबंधांची चौकशी करेल, असे बजावले होते.
ट्रम्प व थिएल यांच्या टीकेवर उत्तर देताना ‘गुगल’ने आपले चीनच्या लष्कराशी संबंध नसल्याचे निवेदन प्रसिद्ध केले होते. मात्र त्यानंतर ट्रम्प यांनी पुन्हा हा मुद्दा उपस्थित करून ‘गुगल’वर चौकशीची टांगती तलवार कायम असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. अमेरिकेच्या संसदेसह विविध यंत्रणांकडून ‘गुगल’सह तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्यांची चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर चीनच्या मुद्यावरून ‘गुगल’ची स्वतंत्र चौकशी करण्याचे संकेत देऊन ट्रम्प यांनी कारवाईची व्याप्ती अधिकच वाढविण्याचे संकेत दिले आहेत.
English हिंदीThere may or may not be National Security concerns with regard to Google and their relationship with China. If there is a problem, we will find out about it. I sincerely hope there is not!!!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) July 26, 2019
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |