ब्रिटनमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी २० हजार पोलीस तैनात करणार – पंतप्रधान बोरिस जॉन्सन

ब्रिटनमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी २० हजार पोलीस तैनात करणार – पंतप्रधान बोरिस जॉन्सन

लंडन, दि. १ (वृत्तसंस्था) – ब्रिटनमधील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी २० हजार अतिरिक्त पोलिसांची तैनाती करण्यात येणार असून येत्या तीन वर्षात ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी घोषणा पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केली. ब्रिटनमध्ये गेल्या काही वर्षात ‘नाईफ क्राईम’सह हिंसक गुन्ह्यांचे प्रमाण भयावहरित्या वाढल्याचे समोर आले होते. या वाढत्या गुन्हेगारीमागे पोलीसदलातील कपात व अपुरी आर्थिक तरतूद ही कारणे समोर आली होती.

बोरिस जॉन्सन, पोलीस तैनात, प्रीति पटेल, पंतप्रधान, पोलिसांची भरती, ब्रिटन, रशिया

गेल्या आठवड्यात पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेणार्‍या जॉन्सन यांनी अंतर्गत सुरक्षा व संरक्षणविभागासाठी आक्रमक धोरण राबविण्याची घोषणा केली होती. अंतर्गत सुरक्षेसाठी पोलीसदलावर भर देण्याची घोषणा करतानाच देशात पहिल्यांदाच ‘नॅशनल पोलिसिंग बोर्ड’ची स्थापनाही करण्यात आली होती. या बोर्डाची पहिली बैठक बुधवारी पार पडली. यावेळी ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीति पटेल, ‘नॅशनल क्राईम एजन्सी’चे संचालक जनरल लिन ओवेन्स यांच्यासह देशातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

‘ब्रिटनमधील गुन्हेगारीचे प्रमाण खाली आणणे आवश्यक आहे. काही प्रमाणात यात यश येत असले तरी अनेक बाबतीत चुकीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. आपण सर्व मिळून यातून मार्ग काढू शकतो आणि त्यासाठी मजबूत पोलीसदलाला प्राधान्य द्यायला हवे’, असे सांगून जॉन्सन यांनी २० हजार अतिरिक्त पोलिसांची भरती व तैनातीची माहिती दिली. येत्या तीन वर्षात ही प्रक्रिया पार पडेल व ब्रिटन सरकार त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देईल, असा दावाही पंतप्रधान जॉन्सन यांनी केला.

ब्रिटीश पंतप्रधानांच्या या घोषणेच्या पार्श्‍वभूमीवर ब्रिटनच्या संसद सदस्यांनी शाळांमध्ये व नजिकच्या परिसरात अतिरिक्त पोलीस तैनातीची मागणी पुढे केली आहे.

रशियाचे सायबर हल्ले व इतर धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी ब्रिटनच्या लष्कराची ‘सिक्स्थ डिव्हिजन’

बोरिस जॉन्सन, पोलीस तैनात, प्रीति पटेल, पंतप्रधान, पोलिसांची भरती, ब्रिटन, रशिया

लंडन – वाढत्या सायबरहल्ल्यांसह, शत्रू देशांकडून ‘इन्फोर्मेशन अ‍ॅण्ड हायब्रिड वॉरफेअर’चा होणारा वापर लक्षात घेऊन ब्रिटीश लष्कराने स्वतंत्र दल उभारण्याची घोषणा केली आहे. या दलाला ‘सिक्स्थ डिव्हिजन’ असे नाव देण्यात आले असून त्यात सुमारे १४,५०० जवानांचा समावेश असणार आहे. ब्रिटीश लष्कराच्या या घोषणेमागे रशियाने सुरू केलेले ‘हायब्रिड वॉरफेअर’ हे मुख्य कारण असल्याचे सांगण्यात येते.

ब्रिटनच्या लष्करातील ‘७७ ब्रिगेड डिसइन्फोर्मेशन युनिट’ व लष्कराच्या इतर विभागांमधील जवान तसेच तज्ज्ञांना एकत्र करून नव्या ‘सिक्स्थ डिव्हिजन’ची उभारणी करण्यात आली आहे. लेफ्टनंट जनरल इवान जोन्स यांच्याकडे नव्या ‘सिक्स्थ डिव्हिजन’ची धुरा देण्यात आली आहे. युद्धाचे रुप सातत्याने बदलत असून ब्रिटीश लष्कराने बदल आत्मसात करून एक सामर्थ्यशाली लष्कर म्हणून सज्ज राहणे आवश्यक आहे, अशा शब्दात जोन्स यांनी नव्या ‘सिक्स्थ डिव्हिजन’च्या स्थापनेमागील भूमिका स्पष्ट केली.

नवे दल सायबरक्षेत्रासह ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक वॉरफेअर’, ‘अन्कन्व्हेंशनल वॉरफेअर’, इन्फोर्मेशन ऑपरेशन्स’ अशा विविध जबाबदार्‍या पार पाडेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा ‘जीसीएचक्यू’बरोबर संयुक्तरित्या मोहिमा आखण्यात येतील व त्यात सायबरहल्ल्यांचाही समावेश असेल, असे सांगण्यात येते.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info