तैवानमधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत चीनविरोधी भूमिका घेणार्‍या ‘त्साई ईंग-वेन’ यांचा विजय

तैवानमधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत चीनविरोधी भूमिका घेणार्‍या ‘त्साई ईंग-वेन’ यांचा विजय

तैपेई/बीजिंग – तैवानमध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत चीनविरोधात आक्रमक भूमिका घेणार्‍या विद्यमान राष्ट्राध्यक्ष ‘त्साई ईंग-वेन’ निर्णायक बहुमताने विजयी झाल्या आहेत. ‘त्साई ईंग-वेन’ यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून ५७ टक्क्यांहून अधिक मते मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी ‘हान कुओ-यू’ यांना फक्त ३८ टक्के मतांवर समाधान मानावे लागले. ‘त्साई ईंग-वेन’ यांनी प्रचारादरम्यान उघडपणे चीनविरोधी भूमिका घेताना हॉंगकॉंगमधील आंदोलनाचा प्रभावी वापर केला होता.

‘त्साई ईंग-वेन’, विजयी, हान कुओ-यू, लोकशाहीवादी सरकार, कारवाई, तैवान, चीन, हॉंगकॉंग‘तैवानचे सार्वभौमत्व व लोकशाही यांना धमकावण्याचा प्रयत्न झाल्यास तैवानची जनता त्याला प्रत्युत्तर देते, हेच या निकालांमधून दिसून आले आहे. चीन यापुढे तैवानवर बळाचा वापर करण्याच्या धमक्या देणार नाही, अशी आशा आहे. लोकशाही मार्गावर चालणारा तैवान व लोकशाहीवादी सरकार चीनच्या धमक्या व दडपणाला बळी पडणार नाही, याची चीनच्या सत्ताधार्‍यांना जाणीव झाली असेल, अशी अपेक्षा ठेवते’, अशा शब्दात ‘त्साई ईंग-वेन’ यांनी आपल्या विजयावर प्रतिक्रिया दिली.

राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येतानाच ‘त्साई ईंग-वेन’ यांनी आपल्या पक्षालाही संसदेत विजय मिळवून देण्यात योगदान दिले आहे. ‘त्साई ईंग-वेन’ यांच्या ‘डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी’ला संसदेच्या ११३ जागांपैकी ६१ जागांवर विजय मिळाला आहे. प्रतिस्पर्धी ‘कौमितांग पार्टी’ला ३८ जागा मिळाल्या आहेत. संसदेतील बहुमतामुळे ‘त्साई ईंग-वेन’ यांना आपली धोरणे अधिक आक्रमकपणे व सहजतेने राबविता येतील, असे मानले जाते.

   ‘त्साई ईंग-वेन’, विजयी, हान कुओ-यू, लोकशाहीवादी सरकार, कारवाई, तैवान, चीन, हॉंगकॉंग    ‘त्साई ईंग-वेन’, विजयी, हान कुओ-यू, लोकशाहीवादी सरकार, कारवाई, तैवान, चीन, हॉंगकॉंग

गेल्या वर्षी एका चिनी हेराने ऑस्ट्रेलियात आश्रय मागताना चीनच्या सत्ताधारी राजवटीवर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यात चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने राष्ट्राध्यक्षा ‘त्साई ईंग-वेन’ यांना सत्तेवरुन दूर करण्यासाठी येत्या निवडणुकीत गडबडी करण्याची योजना आखल्याचा दावाही करण्यात आला होता. त्यासाठी ‘त्साई ईंग-वेन’ यांचे विरोधक असणार्‍या ‘हान कुओ-यू’ यांना चीन पैसा पुरवित असल्याचेही सांगण्यात आले होते. मात्र यू यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते.

त्यानंतर राष्ट्राध्यक्षा वेन यांनी निवडणुकीला काही दिवस उरले असतानाच चीनचा प्रभाव वाढू नये यासाठी स्वतंत्र विधेयक संसदेत सादर केले होते. या ‘अँटी-इन्फिल्ट्रेशन बिल’ अंतर्गत परदेशी सैनिक किंवा गटांच्या तैवानमधील हस्तक्षेपाच्या विरोधात कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. तैवानच्या राजकीय, लष्करी व सामाजिक क्षेत्रावर प्रभाव टाकणे, राजकीय पक्षांना देणगी देणे, समाजव्यवस्था बिघडवणे किंवा निवडणुकीसंदर्भात चुकीच्या माहितीचा प्रचार करणे हा गुन्हा असल्याचे विधेयकात स्पष्ट करण्यात आले होते.

चीननेही या विधेयकावर टीका केली होती. या विधेयकाबरोबरच हॉंगकॉंगमध्ये सुरू असणारे आंदोलन व चीनच्या सत्ताधारी राजवटीने त्याविरोधात घेतलेली भूमिका हा राष्ट्राध्यक्षा वेन यांनी प्रचाराचा मुख्य मुद्दा बनविला होता. हॉंगकॉंगचा हा मुद्दा चीनसमर्थक गटांना चांगलाच अडचणीत आणणारा ठरल्याचे निकालातून स्पष्टपणे समोर आले आहे. त्याचवेळी उघडपणे चीनविरोधी भूमिका घेणार्‍या ‘त्साई ईंग-वेन’ यांच्या विजयामुळे येणार्‍या काळात चीन व तैवानमधील तणाव अधिकच चिघळेल, अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info