चीनमधील ‘वुहान व्हायरस’च्या रुग्णांची संख्या १० हजारांवर गेल्याची भीती – जागतिक आरोग्य संघटनेकडून ‘ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी’च्या घोषणेची शक्यता

चीनमधील ‘वुहान व्हायरस’च्या रुग्णांची संख्या १० हजारांवर गेल्याची भीती – जागतिक आरोग्य संघटनेकडून ‘ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी’च्या घोषणेची शक्यता

बीजिंग/वॉशिंग्टन, दि. २२ (वृत्तसंस्था) – चीनमधून सुरुवात झालेल्या ‘वुहान व्हायरस’च्या साथीची व्याप्ती भयावहरित्या वाढत चालली असून फक्त चीनमध्येच या साथीची लागण १० हजारांहून अधिक जणांना झाली असावी, अशी भीती युरोपातील संशोधकांनी व्यक्त केली. जागतिक आरोग्य संघटनेनेही चीनमधून जगभरात फैलावणार्‍या घातक साथीची दखल घेतली असून ‘ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी’ घोषित करण्याची तयारी सुरू केली आहे. चीनच्या यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारपर्यंत ‘वुहान व्हायरस’मुळे १७ जणांचा मृत्यू झाला असून लागण झालेल्या रुग्णांची संख्या सुमारे ४५० झाली आहे.

‘वुहान व्हायरस’, साथीची लागण, कोरोनाव्हायरस, ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी, विषाणू, तपासणी, चीन, अमेरिका  ‘वुहान व्हायरस’, साथीची लागण, कोरोनाव्हायरस, ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी, विषाणू, तपासणी, चीन, अमेरिका

गेल्या वर्षाच्या अखेरीस चीनमध्ये ‘कोरोनाव्हायरस’ म्हणून ओळखण्यात येणार्‍या विषाणूंच्या प्रकारातील आजाराची साथ समोर आली होती. सुरुवातीला ही साथ चीनच्या वुहान शहरातील ‘सीफूड मार्केट’ व सभोवतालच्या परिसरात मर्यादित असल्याचे दावे करण्यात येत होते. साथीची माहिती बाहेर येण्यास सुरुवात झाल्यानंतर चीनच्या यंत्रणांनी रुग्णांची संख्या ४० ते ४५ इतकीच असल्याचे दावे केले होते. मात्र चीनच्या यंत्रणांची लपवाछपवी काही दिवसांमध्ये समोर आली.

युरोपातील आघाडीच्या संशोधकांच्या एका गटाने विषाणूंची लागण झालेल्यांची संख्या १,७०० हून अधिक असल्याचे भाकित केले आणि त्याने जबरदस्त खळबळ उडाली. आंतरराष्ट्रीय स्तरावरून आलेल्या माहितीनंतर चीनच्या यंत्रणांनी हळुहळू साथीच्या व्याप्तीची आकडेवारी जाहीर करण्यास सुरुवात केली. बुधवारी चीनच्या आरोग्य यंत्रणांकडून देण्यात आलेल्या माहितीत ‘वुहान व्हायरस’ची लागण झालेल्यांची संख्या ४४६ असल्याचे सांगण्यात आले आहे. साथीत बळी पडलेल्यांचा आकडा १७ वर गेला असून येत्या काही दिवसात त्यात भर पडण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

‘वुहान व्हायरस’, साथीची लागण, कोरोनाव्हायरस, ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी, विषाणू, तपासणी, चीन, अमेरिका     ‘वुहान व्हायरस’, साथीची लागण, कोरोनाव्हायरस, ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी, विषाणू, तपासणी, चीन, अमेरिका

त्याचवेळी ‘वुहान व्हायरस’ची लागण झालेल्यांच्या संपर्कात आलेल्या दोन हजारांहून अधिक जणांची तपासणी सुरू असल्याचेही चीनने स्पष्ट केले. चीनमधील तज्ज्ञांनी सदर विषाणूची लागण एका व्यक्तीमधून दुसर्‍या व्यक्तीला संसर्ग होण्यासारखी असल्याचेही मान्य केले आहे. मात्र सदर विषाणूचा नक्की स्रोत अद्यापही जाहीर न केल्याने ‘वुहान व्हायरस’भोवतालचे गूढ अद्यापही कायम आहे. या गूढामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून इंधन तसेच सोन्याच्या बाजारपेठांवर त्याचे परिणाम होतील, असा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, चीनच्या ‘वुहान व्हायरस’ची साथ दिवसेंदिवस अधिकच पसरत चालली असून अमेरिकेतही या साथीचा रुग्ण आढळला आहे. मंगळवारी अमेरिकेच्या आरोग्य विभागाने पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील माहिती जाहीर केली. अमेरिकेच्या वॉशिंग्टन प्रांतातील एका तिशीतील तरुणाला ‘वुहान व्हायरस’ची लागण झाली असून त्याने नुकतीच चीनला भेट दिल्याचे समोर आले आहे. सध्या सदर रुग्णाला ‘प्रोव्हिडन्स रिजनल मेडिकल सेंटर’मध्ये विशेष विभागात दाखल करण्यात आले असल्याचे अमेरिकी अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेतील या रुग्णापाठोपाठ थायलंडमध्ये एका अमेरिकी नागरिकालाही ‘वुहान व्हायरस’ची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. जपान, दक्षिण कोरिया, तैवान या देशांमध्येही ‘वुहान व्हायरस’चे रुग्ण आढळले आहेत. या वाढत्या प्रसाराच्या पार्श्‍वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी तातडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत चीनमधील ‘वुहान व्हायरस’च्या साथीला ‘ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी’ घोषित करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात येते.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info