गेल्या काही वर्षात चीनच्या युद्धनौका व लढाऊ विमानांनी तैवानच्या हद्दीत सातत्याने घुसखोरीचे प्रयत्न चालविले आहेत. यामागे चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीचे वर्चस्ववादी धोरण हे प्रमुख कारण असून तैवानमधील चीनविरोधी सरकार आणि अमेरिकेच्या वाढलेल्या हालचालीदेखील निमित्त ठरल्याचे दिसत आहे. कोरोनावायरस साथीच्या पार्श्वभूमीवर चीनमधील तैवानविरोधी सूर अधिकच आक्रमक झाला असून लष्करी अधिकारी व विश्लेषकांकडून तैवानवर हल्ला चढविण्याची मागणी होत आहे.
गेल्या महिन्यात चीनमध्ये झालेल्या बैठकीत कम्युनिस्ट पार्टीचे तिसऱ्या क्रमांकाचे नेते असलेल्या ली झान्शू यांनी थेट तैवानवर हल्ला चढविण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्याचवेळी १५ वर्षांपूर्वी लागू करण्यात आलेल्या विघटनवादविरोधी कायद्यानुसार लष्करी कारवाई करुन तैवानवर हल्ला चढविता येऊ शकतो, असे चीनचे संरक्षणदलप्रमुख ‘ली जाऊचेंग’ यांनी या बैठकीत सुचविले होते. त्यापूर्वी, संपूर्ण जग कोरोनाचा मुकाबला करण्यात गुंतलेले असताना तैवानवर आक्रमण करण्याची नामी संधी आपल्याकडे असल्याचा दावा चीनच्या माजी लष्करी अधिकाऱ्यांनी केला होता. या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर चीनच्या लढाऊ विमानांचा घुसखोरीचा प्रयत्न लक्ष वेधून घेणारा ठरतो.
अमेरिकन नौदलाच्या विमानाने तैवानच्या हद्दीतून केलेला प्रवास आणि काही तासांनी त्याच भागात चीनच्या लढाऊ विमानांनी केलेला घुसखोरीचा प्रयत्न यामुळे या संपूर्ण घटनाक्रमाभोवतालचे गूढ अधिकच वाढले आहे. काही प्रसारमाध्यमे व विश्लेषकांनी याचा संबंध साऊथ चायना सीमध्ये अमेरिका व चीनमध्ये असलेल्या तणावाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्याच आठवड्यात अमेरिकेच्या ‘यूएसएस मस्टिन’ या विनाशिकेने तैवानच्या आखातातून गस्त घातली होती. त्यानंतर मिलिटरी प्लेनचे उड्डाण करून तैवानमधील आपल्या हालचाली वाढविल्याचे स्पष्ट संकेत अमेरिकेने दिले आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |